पुढारी ऑनलाईन डेस्क: मागील काही दिवसांपासून जम्मू काश्मीरमधील अनेक भागांत दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी महत्त्वाची आज (दि.१४ ऑगस्ट) बैठक बोलवली आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे.
जम्मू-काश्मीरमधील वाढत्या दहशतवादी घटनांबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. साउथ ब्लॉक येथे सुरू असलेल्या बैठकीत भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, भारतीय लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आणि इतर सुरक्षा-संबंधित संस्थांचे प्रमुख भाग घेत आहेत. संरक्षण सचिव आणि DGMO (डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स) देखील बैठकीला उपस्थित आहेत, असेही वृत्तात म्हटले आहे.