जम्मू-काश्मीर विधानसभा प्रचारासाठी खासदार राशीद इंजिनियरला जामीन

Rashid Engineer | २ ऑक्टोबरपर्यंत अंतरिम जामीन मंजूर
MP Rashid Engineer granded bail
शेख राशीद उर्फ राशीद इंजिनियर यांना अंतरिम जामीन मिळाला आहे. Pudhari Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयाने जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला मतदारसंघाचे खासदार शेख राशीद उर्फ राशीद इंजिनियरला अंतरिम जामीन दिला आहे. न्यायालयाने जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी दहशतवादी फंडिंग प्रकरणात २ ऑक्टोबरपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे.

बारामुल्ला लोकसभा मतदारसंघाचे खासदार राशीद इंजिनियर २०१७ च्या दहशतवादी फंडिंग प्रकरणात दिल्लीच्या तिहार तुरुंगात आहेत. या बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा (यूएपीए) नुसार राशीदवर कारवाई करण्यात आली आहे. आता विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अंतरिम जामीनाची मागणी राशीदने केली. त्यानंतर न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला.

MP Rashid Engineer granded bail
जम्मू, काश्मीर : कलम ३७० पुन्हा लागू होणार का? भाजपच्या जाहिरनाम्यात मोठी घोषणा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news