

पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू-काश्मीरमध्ये ९ जून रोजी झालेल्या रियासी दहशतवादी हल्ल्याचा तपास केंद्रीय गृह मंत्रालयाने राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए )कडे सोपविण्यात आला आहे.
९ जून रोजी वैष्णोदेवी यात्रेकरूंना घेऊन जाणारी बसवर रियासी येथे दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर बस दरीत कोसळली होती. यामध्ये ९ जण ठार तर ३३ जण जखमी झाले होते.