जम्मू-काश्मीर लवकरच जगातील टॉप 50 पर्यटनस्थळांत

जम्मू-काश्मीर लवकरच जगातील टॉप 50 पर्यटनस्थळांत

श्रीनगर; वृत्तसंस्था :  जम्मू आणि काश्मीरचा लवकरच जगातील टॉप 50 पर्यटनस्थळांमध्ये समावेश होईल, असा विश्वास उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी व्यक्त केला. पर्यटन कार्यगटाच्या दुसर्‍या बैठकीत ते बोलत होते.

श्रीनगरमध्ये बुधवारी जी 20 पर्यटन कार्यगटाच्या बैठकीच्या तिसर्‍या आणि शेवटच्या दिवशी जी 20 प्रतिनिधींनी क्राफ्ट मार्केटमध्ये खरेदी केली. पर्यटन कार्यगटाच्या तिसर्या दिवसाची सुरुवात विदेशी प्रतिनिधींसाठीच्या योग सत्राने झाली. प्रतिनिधींना निशात गार्डन, चष्मा शाही, परी महल, काश्मीर आर्ट एम्पोरियम आणि पोलो व्ह्यू मार्केटसह अनेक ठिकाणी सहलीला नेण्यात आले. बैठकीनंतर काश्मीरमध्ये विदेशी पर्यटकांची संख्या झपाट्याने वाढेल असा विश्वास काश्मीरमधील तरुणांना आहे. 5 देशांचा असहभाग बैठकीत चीन, सौदी अरेबिया, तुर्किये, इंडोनेशिया आणि इजिप्त या 5 देशांनी सहभाग घेतला नाही.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news