Jammu Kashmir Assembly Elections 2024 : दुपारी तीन वाजेपर्यंत 50.65 टक्के मतदान

२४ जागांसाठी २१९ उमेदवार रिंगणात
Jammu Kashmir Assembly Elections 2024
जम्मू-काश्मीर विधानसभेच्या २४ जागांसाठी मतदान सुरू आहे.file photo
Published on
Updated on

दुपारी तीन वाजेपर्यंत 50.65 टक्के मतदान

जम्मू -काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी आज सकाळी मतदानाला सुरूवात झाली. दुपारी तीन वाजेपर्यंत 50.65 टक्के मतदान झाले आहे.

किश्तवाडच्या बागवानमध्ये गोंधळ

जम्मू-काश्मीरमधील किश्तवाडमधील बागवान मोहल्ला येथील मतदान केंद्रावर मतदार ओळखीवरून झालेल्या विरोधानंतर काही काळ मतदान थांबवण्यात आले.

अनंतनाग : PDP प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांच्या आई गुलशन आरा यांनी मतदानाचा हक्का बजावला.

दुपारी 1 वाजेपर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये 41.17 टक्के मतदान

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, दुपारी 1 वाजेपर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये 41.17 टक्के मतदान झाले.

अनंतनागमध्ये 37.90 टक्के मतदान

दोडामध्ये 50.81 टक्के मतदान झाले

किश्तवारमध्ये 56.86 टक्के मतदान झाले

कुलगाममध्ये 39.91 टक्के मतदान

पुलवामामध्ये 29.84 टक्के मतदान

रामबनमध्ये 49.68 टक्के मतदान झाले

शोपियानमध्ये 38.72 टक्के मतदान झाले

सकाळी 11 वाजेपर्यंत 26.72 टक्के मतदान

निवडणूक आयोगानुसार, जम्मू आणि काश्मीरमध्ये सकाळी 11 वाजेपर्यंत 26.72 टक्के मतदान झाले.

अनंतनाग- 25.55%

डोडा- 32.30%

किश्तवार-32.69%

कुलगाम-25.95%

पुलवामा - 20.37%

रामबन-31.25%

शोपियान- 25.96%

सकाळी ९ वाजेपर्यंत ११.११ टक्के मतदान

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ९ वाजेपर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये ११.११ टक्के मतदान झाले.

कुलगाममध्ये १०.७७ टक्के मतदान झाले

दोडामध्ये १२.९० टक्के मतदान

रामबनमध्ये ११.९१ टक्के मतदान झाले

शोपियानमध्ये ११.४४ टक्के मतदान झाले

अनंतनागमध्ये १०.२६ टक्के मतदान

पुलवामा येथे ९.१८ टक्के मतदान झाले

किश्तवारमध्ये १४.८३ टक्के मतदान झाले

काश्मीरमधील १६ आणि जम्मूमधील ८ जागांसाठी मतदान

जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० हटवल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका (Jammu Kashmir Assembly Elections 2024) होत आहेत. पहिल्या टप्प्यातील २४ विधानसभा जागांसाठी सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. यामध्ये काश्मीरमधील १६ आणि जम्मूमधील ८ जागांचा समावेश आहे. एकूण ३२७६ मतदान केंद्रांवर ही निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे.

पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू-काश्मीरमध्ये १० वर्षांनंतर विधानसभा निवडणुका होत आहेत. पहिल्या टप्प्यात जम्मू-काश्मीर विधानसभेच्या २४ जागांसाठी (Jammu Kashmir Assembly Elections 2024) आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. २३ लाखांहून अधिक पात्र मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ९० अपक्ष उमेदवारांसह २१९ उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news