JAIPUR ALERT | जयपूरमध्ये हाय अलर्ट! मंदिरांबरोबर मशीद हटविण्यापूर्वी इंटरनेट सेवा खंडित; शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त

शहरातील जगतपुरा परिसरात प्रशासनाची अतिक्रमणविरोधात मोठी कारवाई
agatpura anti encroachment drive
जयपूर शहराच्या जगतपुरा भागात प्रशासनाने मोठी अतिक्रमणविरोधी मोहीम सुरू केल्यामुळे, सोमवारी शहरात मोठा पोलीस बंदोबस्‍त तैनात करण्‍यात आला आहे. Pudhari
Published on
Updated on

Jaipur Internet Suspended : जयपूर विकास प्राधिकरणाने (JDA) शहराच्या जगतपुरा भागात मोठी अतिक्रमणविरोधी मोहीम सुरू केल्यामुळे, सोमवारी संपूर्ण जयपूरमध्ये इंटरनेट सेवा तात्पुरती बंद करण्यात आली असून हजारो पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

शहरातील इंटरनेट सेवा का केली खंडित?

जयपूरमधील नांदपुरी रस्त्यावरील रखडलेल्या रस्ता रुंदीकरण प्रकल्पाचा हा एक भाग आहे. रेल्वे लाईनला समांतर असणाऱ्या १.५ किलोमीटरच्या रस्त्याची रुंदी सध्या २५ ते ३० फूट आहे, ती मंजूर नियमांनुसार ८० फुटांपर्यंत वाढवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. या मोहिमेदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरू नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून इंटरनेट सेवा तात्पुरती खंडित करण्यात आल्याचे जयपूर जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

agatpura anti encroachment drive
Sambhajinagar encroachment drive viral video : अतिक्रमण कारवाईपूर्वी 24 तासांची पूर्वसूचना द्या!

अतिक्रमण जागेतील पाच धार्मिक स्थळे हटवणार

शहरात राबविल्या जाणाऱ्या अतिक्रमणविरोधी मोहिमेत रस्त्याच्या मर्यादेत येणारी पाच धार्मिक स्थळे हटवली जाणार आहेत. यामध्ये एक मशीद, दोन मंदिरे, एक सत्संग हॉल आणि एका मजारीचा समावेश आहे. अतिक्रमणात असणारे या इमारतींचे बांधकाम गेल्या अनेक वर्षांपासून रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरत होते आणि यापूर्वीच त्यांना नोटीस बजावण्यात आली होती. प्रशासनाने थेट कारवाई सुरू करण्यापूर्वी संबंधितांना हे बांधकाम स्वतःहून हटवण्यासाठी वेळही देण्यात आला होता.

agatpura anti encroachment drive
Nashik Ozar Airport : जयपूर, हैदराबाद विमानसेवेला नाशिककरांचा जोरदार प्रतिसाद

शहरात तीन हजारहून अधिक पोलीस कर्मचारी तैनात

दक्षता विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक (DIG) आनंद शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ मे रोजी झालेल्या मोहिमेत याच रस्त्यावरील १३४ अतिक्रमणे हटवण्यात आली होती. त्यानंतर धार्मिक संस्था आणि इतर रहिवाशांना अतिक्रमण हटवण्यासाठी अतिरिक्त वेळ देण्यात आला होता; परंतु आता ही मुदत संपली आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी प्रशासनाने कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. शहरात ३,००० हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले असून, यामध्ये राजस्थान आर्म्ड कॉन्स्टेब्युलरीच्या (RAC) १२ कंपन्यांचा समावेश आहे. याशिवाय जयपूर, कोटा आणि भरतपूर रेंजमधून अतिरिक्त पोलीस दल मागवण्यात आले आहे, तसेच शहरातील संवेदनशील भागांवर कडक नजर ठेवली जात आहे. ऑनलाइन माध्यमातून खोटी किंवा जातीयदृष्ट्या संवेदनशील माहिती पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे.

agatpura anti encroachment drive
Nashik - मनमाडला चौथ्या दिवशी हटविली ५०० अतिक्रमणे

५० हून अधिक कॉलनींना होणारा रस्ता रुंदीकरणाचा फायदा

हा रस्ता रुंद झाल्यामुळे जगतपुरा आणि मालवीय नगर, प्रधान मार्ग आणि अपेक्स सर्कल यांसारख्या प्रमुख भागांमधील कनेक्टिव्हिटी सुधारेल, तसेच हरे कृष्ण मार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होईल. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर याचा फायदा परिसरातील सुमारे ५० कॉलनींना होईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या कारवाईमुळे नागरिकांना दिवसभर पाडकामाच्या ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था आणि वाहतुकीवरील संभाव्य निर्बंधांना सामोरे जावे लागू शकते, त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सामाजिक संघटनांचा आक्षेप

या अतिक्रमणविरोधी मोहिमेवर काही राजकीय नेते आणि सामाजिक संघटनांनी आक्षेप घेतला आहे. काँग्रेस आमदार रफिक खान यांनी या कारवाईच्या घाईगडबडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणाले की, "धार्मिक स्थळांशी संबंधित बाबींवर चर्चा आणि सहमतीने निर्णय घ्यायला हवा." या प्रक्रियेदरम्यान सामाजिक सलोखा राखला जाईल याची खात्री करावी, असे आवाहन त्यांनी प्रशासनाला केले. मशीद आणि मजारीशी संबंधित काही सामाजिक संघटना आणि प्रतिनिधींनीही या कारवाईला विरोध केला असून, धार्मिक स्थळांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात असल्याचा आरोप केला आहे. या कारवाईविरोधात कायदेशीर आणि शांततापूर्ण मार्गाने लढा सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news