ISRO चे क्रांतिकारी पाऊल ! 'Spadex' मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण

PSLV-C60/SPADEX Mission | 'डॉकिंग'मध्ये प्रभुत्व मिळवणारा भारत ठरला चौथा देश
PSLV-C60/SPADEX Mission
PSLV-C60/SPADEX Mission | ISRO ने रचला इतिहास ! 'Spadex' मोहीम यशस्वीप्रातिनिधिक छायाचित्र.Image source- X
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने 'स्पेडेक्स'चे (Spadex) PSLV-C60 द्वारे आज (दि.३०) रात्री १० वाजता श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वी प्रक्षेपण केले. 'स्‍पेडेक्‍स'च्‍या यशस्‍वी प्रक्षेपणानंतर अमेरिका, रशिया आणि चीननंतर भारत अंतराळ डॉकिंगमध्ये प्रभुत्व मिळवणारा चौथा देश ठरला आहे. अंतराळातील 'डॉकिंग' प्रणालीत भारताने आज नवीन इतिहास घडवला आहे.

'डॉकिंग' प्रक्रिया नेमकी काय आहे?

'SpaDeX' मोहिमेमध्ये दोन लहान अंतराळयानांचा समावेश असेल, प्रत्येकाचे वजन सुमारे 220 किलो असेल. हे एकाच वेळी PSLV-C60 रॉकेटद्वारे 55° वर झुकलेल्या कक्षेत 470 किमी उंचीवर सोडले जातील. प्रक्षेपणानंतर, दोन्ही वाहने 10-20 किमी अंतर राखून हळूहळू एकमेकांच्या जवळ येतील. या प्रक्रियेत, लक्ष्य वाहन आणि चेझर वाहन यांच्यातील वेग नियंत्रित केला जाईल, जेणेकरून डॉकिंग प्रक्रिया पूर्ण करता येईल.

अंतराळात २ उपग्रह असे करणार 'डॉकिंग'

या मोहिमेत वर्कहॉर्स पोलर सॅटेलाइट लाँच व्हेईकल (PSLV) रॉकेट वापरून सुमारे २२० किलो वजनाचे दोन खास डिझाइन केलेले उपग्रह प्रक्षेपित करण्याचे उद्दिष्ट्ये समाविष्ट आहे. चेसर (SDX01) आणि टार्गेट (SDX02) असे हे उपग्रह पृथ्वीपासून ४७० किलोमीटर उंचीवर डॉक करण्याचा प्रयत्न करतील. ही तांत्रिक कामगिरी विशेषतः महत्त्वाची आहे कारण रशिया, अमेरिका आणि चीन या तीन देशांनी यापूर्वी अशा गुंतागुंतीच्या स्पेस डॉकिंग तंत्रांमध्ये प्रभुत्व मिळवले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news