इस्त्रोने स्पाडेक्स 'डॉकिंग' चाचणी पुढे ढकलली !

Spadex mission docking | 'या' तारखेला होणार 'डॉकिंग' प्रक्रिया
Spadex mission docking
Spadex mission docking | इस्त्रोने स्पाडेक्स 'डॉकिंग' चाचणी पुढे ढकलली !Pudhari File Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क: इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन अर्थात इस्रोने नुकतेच श्रीहरिकोटा येथून पीएसएलव्ही रॉकेटद्वारे अत्यंत महत्त्वाकांक्षी स्पाडेक्स मिशन (स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट) लाँच केले. दरम्यान घेण्यात येणारी डॉकिंग चाचणी आता पुढे ढकलण्यात आली आहे. यापूर्वी स्पाडेक्स डॉकिंग मंगळवारी ७ जानेवारीला होणार होते, मात्र आता हीच चाचणी गुरूवारी ९ जानेवारीला होणार असल्याची अपडेट इस्रोने त्यांच्या एक्स ( X ) अकाऊंटवरून दिली आहे. मात्र, इस्रोने चाचणी पुढे ढकलण्याचे कारण सांगितलेले नाही.

इस्रोने सोमवार ३० डिसेंबर २०२४ रोजी, SDX01 (चेझर) आणि SDX02 (लक्ष्य) हे दोन लहान उपग्रह श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपित करण्यात आले होते. या मिशनमध्ये पीएसएलव्ही रॉकेटच्या सहाय्याने अंतराळात दोन छोट्या यानांचे डॉकिंग करणे म्हणजेच जोडणे आणि अनडॉक करणे (वेगळे करणे) ही प्रक्रिया पूर्ण करणे हा इस्रोच्या या मोहिमेचा उद्देश आहे.

काय आहे डॉकिंग चाचणी? 

या मोहिमेत एकाच रॉकेटमध्ये उपग्रहाचे दोन भाग सोडण्यात आले आहेत. पण अवकाशात ते वेगवेगळ्या ठिकाणी स्थापित करण्यात येणार आहेत. त्यानंतर त्यांना एकमेकांच्या जवळ आणून जोडले जाणार आहे. चेसर आणि टार्गेट अशी या दोन उपग्रहांची नावे आहेत. या मिशनमध्ये, चेसर लक्ष्याचा पाठलाग करेल आणि त्याच्याशी डॉक करेल. टार्गेट आणि चेसरचा वेग ताशी 28 हजार 800 किलोमीटरपर्यंत जाणार आहे. सुमारे 20 किलोमीटरपर्यंतच्या अंतरावरून चेसर स्पेसक्राफ्ट टार्गेट स्पेसक्राप्टच्या दिशेने जाईल. त्यानंतर हे अंतर कमी होऊन 5 किलोमीटर अंतरापर्यंत पोहोचणार आहे. त्यानंतर दीड किलोमीटर आणि पुढे जाऊन 500 मीटर होईल. जेव्हा चेसर आणि टार्गेटच्या दरम्यानचे अंतर तीन मीटरवर येईल तेव्हा डॉकिंग म्हणजे दोन्ही स्पेसक्राफ्टच्या जोडण्याची प्रक्रिया सुरू होईल. चेसर आणि टार्गेट जोडल्या गेल्यानंतर इलेक्ट्रिकल पॉवर ट्रान्सफर केले जाईल. ही सर्व प्रक्रिया पृथ्वीवरून नियंत्रित केली जाणार आहे.

स्पेस डॉकिंग करणारा भारत बनला चौथा देश

अंतराळातील दोन वेगवेगळ्या गोष्टींना जोडण्याचे हे तंत्रज्ञान आगामी काळात भारताला स्वतःचे अंतराळ स्थानक तयार करण्यास सहाय्यभूत ठरणारे आहे. अशा प्रकारच्या स्वदेशी डॉकिंग प्रणालीद्वारे स्पेस डॉकिंग करणार्‍या देशांच्या निवडक गटामध्ये सामील होणारा भारत हा चौथा देश बनला आहे. सध्या या गटात अमेरिका, चीन आणि रशिया यांचा समावेश आहे. 16 मार्च 1966 रोजी अमेरिकेने प्रथम अंतराळात डॉकिंग केले होते. सोव्हिएत युनियनने 30 ऑक्टोबर 1967 रोजी पहिल्यांदा दोन स्पेसक्राफ्ट डॉकिंग केले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news