ISRO ची आणखी एक कमाल! 'पुष्पक'चे तिसऱ्यांदा यशस्वी लँडिंग

ISRO ची कमाल! 'पुष्पक'चे तिसऱ्यांदा यशस्वी लँडिंग
ISRO Pushpak
ISRO ने आज रियुजेबल लॉन्च व्हेईकल (RLV) च्या लँडिंग प्रयोग (LEX) मध्ये सलग तिसऱ्यांदा यश मिळविले. ISRO
Published on
Updated on

भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने रविवारी (दि. २३) आणखी एक मैलाचा दगड पार केला. ISRO ने आज रियुजेबल लॉन्च व्हेईकल (RLV) च्या लँडिंग प्रयोग (LEX) मध्ये सलग तिसऱ्यांदा आणि अंतिम यश मिळविले. “पुष्पक”ने आव्हानात्मक परिस्थितीत आधुनिक स्वायत्त क्षमता दाखवून धावपट्टीवर समांतर असे अचूक लँडिंग केले, अशी माहिती ISRO ने X ‍‍‍वर पोस्ट करत दिली आहे.

Summary

RLV पुष्पक विषयी....

  • LEX (03) च्या मालिकेतील तिसरी चाचणी कर्नाटकमधील चित्रदुर्ग येथे घेतली.

  • पुष्पकला भारतीय हवाई दलाच्या चिनूक हेलिकॉप्टरमधून ४.५ किमी उंचीवरून सोडले.

  • त्याने धावपट्टीच्या मध्यभागी अचूक लँडिंग केले.

  • ही मोहीम म्हणजे इस्रो, भारतीय हवाई दल आणि इतर संस्थांचा एक संयुक्त प्रयत्न होता.

पुष्पकला भारतीय हवाई दलाच्या चिनूक हेलिकॉप्टरमधून ४.५ किमी उंचीवरून सोडण्यात आले. धावपट्टीपासून ४.५ किमी उंच असलेल्या रिलीझ पॉईंटवरून स्वायत्तपणे क्रॉस-रेंज करेक्शन कौशल्य दाखवत पुष्पक धावपट्टीजवळ पोहोचले आणि त्याने धावपट्टीच्या मध्यभागी अचूक लँडिंग केले.

ISRO Pushpak
पुष्पकची तिसरी आणि अंतिम चाचणी कर्नाटक येथील चित्रदुर्ग येथे एरोनॉटिकल टेस्ट रेंज (ATR) येथे आयोजित करण्यात आली होती. ISRO

RLV-LEX-03 मिशनने LEX-02 मिशनमध्ये पंख असलेल्या बॉडीचा आणि उड्डाण प्रणालींचा पुनर्वापर केला. ही कामगिरी अनेक मोहिमांसाठी उड्डाण प्रणालींचा पुनर्वापर करण्यासाठी इस्रोच्या डिझाइनच्या क्षमतेची मजबूतता दर्शविते. ही मोहीम इस्रोची केंद्रे, भारतीय हवाई दल आणि इतर संस्थांचा समावेश असलेला एक संयुक्त प्रयत्न होता.

ISRO Pushpak
पुष्पकला भारतीय हवाई दलाच्या चिनूक हेलिकॉप्टरमधून ४.५ किमी उंचीवरून सोडण्यात आले होते. ISRO

इस्रोची कमाल, तंत्रज्ञानाच्या यशाची पुष्टी

गेल्या वर्षीही, इस्रोने रियुजेबल लॉन्चिंग व्हेईकल चाचणी दरम्यान, RLV हे हवाई दलाच्या चिनूक हेलिकॉप्टरमधून सुमारे साडेचार किलोमीटर उंचीवरून सोडण्यात आले होते. चाचणी दरम्यान, RLV धावपट्टीवर यशस्वीरित्या उतरले. RLV ने ब्रेक पॅराशूट, लँडिंग गियर ब्रेक आणि नोज व्हील स्टीयरिंग सिस्टमच्या मदतीने धावपट्टीवर यशस्वी लँडिंग केले. या यशस्वी लँडिंगने नेव्हिगेशन, कंट्रोल सिस्टम, लँडिंग गियर आणि डिलेरेशन सिस्टम यासारख्या इस्रोने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाच्या यशाची पुष्टी केली होती.

ISRO Pushpak
कोल्हापूर : महापालिका शाळांतील मुले विमानातून ‘इस्रो’ला रवाना

सोमनाथ यांच्याकडून टीमचे अभिनंदन

ISRO चे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी अशा गुंतागुंतीच्या मोहिमांमध्ये यशस्वी कामगिरी कायम राखण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल टीमचे अभिनंदन केले आहे. व्हीएसएससीचे संचालक डॉ. एस उन्नीकृष्णन नायर यांनी म्हटले आहे की, या सातत्यपूर्ण यशामुळे भविष्यातील कक्षीय पुनर्प्रवेश मोहिमेसाठी आवश्यक असलेल्या महत्त्वपूर्ण तंत्रज्ञानावरील इस्रोचा आत्मविश्वास वाढला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news