Basmati Rice Export: इराण - इस्त्रायल युद्धाचा बासमती तांदळावर होणार परिणाम... किंमत कमी होणार?

Basmati Rice Export
Basmati Rice Exportpudhari photo
Published on
Updated on

Basmati Rice Export: इराण-इस्त्रायल युद्धाचा भडका उडाल्यानंतर इराणने होर्मुज सामुद्रधुनी बंद केली आहे. त्यामुळं जगाच्या व्यापाऱ्यावर मोठा परिणाम झाला आहे. जगाचा मोठा व्यापार हा जलमार्गाद्वारे होतो. भारतासह अनेक देशांना क्रूड आईल, गॅस याच मार्गाने पुरवठा होतो. तर भारत या मार्गाने आखाती देशांना तांदूळ निर्यात करतो.

Basmati Rice Export
Israel Iran Conflict: आमचं काय बोलणं झालं हे सांगत नाही मात्र.... नेतान्याहूंनी का मानले पंतप्रधान मोदींचे आभार

सहा लाख टन तांदूळ समुद्रात

ऑल इंडिया राईस एक्सपोर्ट असोसिएशनचे माजी अध्यक्ष विजय सेतिया यांनी सांगितलं की, भारतातून आखाती देशांना पाठवण्यात येणारा तांदळाचा ट्रांझिट कालावधी हा ४० दिवसाचा आहे. त्यात भारतीय बंदरांवर, जहाजावर आणि डेस्टिनेशन देशाच्या बंदरांवरील लागणाऱ्या कालावधीचा समावेश आहे.

सध्याच्या घडीला तांदळाची निर्यात थांबली आहे. मात्र काही दिवसांपूर्वी पाठवलेला जवळपास सहा लाख टन तांदूळ बंगरे, समुद्र आणि डेस्टिनेशन देशांच्या बंदरांवर अडकून पडला आहे.

Basmati Rice Export
Iran Israel War Update | युद्ध किती दिवस चालणार? : इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी दिले उत्तर

हजारो कोटी रूपये अडकले

सेतिया यांनी सांगितलं की या घडीला वेगवेगळ्या बंदरांवर आणि समुद्रात भारतीय बासमती तांदळाच्या कंन्साईनमेंट अडकल्या आहेत. त्याची किमंत जवळपास पाच ते सहा हजार कोटी रूपये इतकी आहे. निर्यातदारांचा इतका माल अडकल्यामुळं त्यांनी नवीन कन्साईनमेंट पाठवण्यासाठीचे पॅकिंग थांबवलं आहे. ज्यावेळी परिस्थिती अनुकूल होईल त्यानंतर निर्यातीचं काम पुन्हा सुरू होणार आहे.

Basmati Rice Export
US - Iran War |आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सांगली प्रशासनामार्फत नियंत्रण कक्ष

७० टक्के निर्यात खाडी देशात

भारत दर वर्षी जवळपास ६० लाख टन बासमती तांदूळ निर्यात करतो. त्यातील जवळपास ७० टक्के तांदूळ हा आखाती देशांना निर्यात केला जातो. म्हणजे दर वर्षी जवळपास ४५ लाख टन बासमती तांदूळ आखाती देशात निर्यात होतो. यातील सहा ते सात टन बासमती तांदूळ हा इराणला निर्यात होत होता. इराणला बासमती तांदळाची निर्यात रेकॉर्ड १४ लाख टन इतकं आहे. आता युद्धाच्या परिस्थितीत आखाती देशांना होणाऱ्या निर्यातीचं काय होणार याची कल्पना आपल्याला आलीच असेल.

Basmati Rice Export
Iran-US War Prediction : युद्धाची भविष्यवाणी खरी ठरली; पुण्यातील ज्योतिषी गौरव देशपांडे यांचा Video व्हायरल

गेल्या वर्षी ६० लाख टन निर्यात

ऑल इंडिया राईस एक्सपोर्टर्स असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार गेले आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये भारतानं एकूण ६०.६५ लाख टन बासमती तांदूळ निर्यात केला होता. याची रूपयातील मुल्य हे ५० हाजर ३१२ कोटी रूपये इतकी होते. भारतात २०२४-२५ मध्ये एकूण १५.०१ कोटी टन तांदळाचं उत्पादन झालं होतं. त्यातील बासमती तांदळाचे उत्पादन हे ७० ते ७५ टन इतकं होतं. चालू आर्थिक वर्षात एप्रिल पासून डिसेंबरपर्यंत आखाती देशांना ३२ लाख टनपेक्षा जास्त बासमती तांदूळ निर्यात करण्यात आला आहे.

Basmati Rice Export
Iran-US War Prediction : युद्धाची भविष्यवाणी खरी ठरली; पुण्यातील ज्योतिषी गौरव देशपांडे यांचा Video व्हायरल

दरांवर होणार परिणाम?

विजय सेतिया यांच्या म्हणण्यानुसार जर इराण - इस्त्रायल लष्करी संघर्ष वाढला आणि लांबला तर त्याचा परिणाम लवकरच भारतात बासमती तांदळाच्या दरांवर पडले. बासमती तांदळाचे दर कमी होण्याची शक्यता आहे. सध्याच्या घडीला निर्यातदारांनी तांदळाचे पँकिंग करणे थांबवलं आहे. ते वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news