Indu Prakash Mishra : जगाचं भविष्य वर्तवणाऱ्या ज्योतिषाचार्यांना पत्नीचं 'राजकीय' भविष्य कळलं नाही! 'युपी'तील निवडणुकीत पराभव

विधान परिषद निवडणुकीत पत्‍नीला मिळाली ३०० पेक्षा कमी मते
Indu Prakash Mishra wife election defeat
प्रसिद्ध ज्योतिषी इंदू प्रकाश मिश्रा यांच्या पत्नीचा पराभव हा सर्वसामान्यांच्या चर्चेचा विषय ठरला आहे.Pudhari News
Published on: 
Updated on: 

Indu Prakash Mishra wife election defeat : ज्योतिष सर्वसामान्यांच्या आयुष्याची भाकिते वर्तवत असतात; करिअरपासून विवाहापर्यंत अनेक जण ज्योतिषाचा सल्ला घेऊनच पावले उचलतात. यातील किती निर्णय योग्य ठरणार, हा अनुभवाचा भाग असला, तरी जेव्हा एखादा ज्योतिषाचार्य आपल्याच पत्नीला राजकारणात करिअर करण्याचा सल्ला देतो, पतीचे भाकित कधीही खोटे ठरणार नाही, या अतूट विश्वासापोटी पत्नीनेही थेट निवडणूक रिंगणात उडी घेतली; मात्र हा अंदाज चुकला आणि शेवटी त्यांना एका नामुष्कीजनक पराभवाला सामोरे जावे लागले. हे घडलं आहे उत्तर प्रदेश विधान परिषद निवडणुकीत. येथे प्रसिद्ध ज्योतिषी इंदू प्रकाश मिश्रा यांच्या पत्नीचा पराभव हा सर्वसामान्यांच्या चर्चेचा विषय ठरला आहे.

ज्योतिषाचार्य इंदू प्रकाश मिश्रा यांच्या पत्नी निवडणूक रिंगणात

ज्योतिषाचार्य इंदू प्रकाश मिश्रा यांच्या पत्नी स्मिता मिश्रा यांनी लखनौ पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवली. यासाठी त्यांनी २८ सप्टेंबर २०२६ रोजी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यावेळी उत्तर प्रदेश काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष अजय राय यांनी त्यांना लखनौ जागेवरून उमेदवारी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, काही दिवसांतच अजय राय यांना उत्तर प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदावरून हटवण्यात आले. त्यानंतर त्यांच्या जागी आलेल्या आराधना मिश्रा यांनी स्मिता मिश्रा यांना एमएलसी (MLC) निवडणूक तिकिट नाकारले. अशा परिस्थितीत, मिश्रा यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उडी घेतली होती.

Indu Prakash Mishra wife election defeat
UP Recruitment Rules : 'रेजिम चेंज'मध्‍ये सहभागी होणार्‍यांना सरकारी नोकरी नाही : उत्तर प्रदेश सरकारचा मोठा निर्णय

मिश्रा यांचा नामुष्कीजनक पराभव

लखनौ पदवीधर मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत स्मिता मिश्रा यांना ३०० मतेही मिळवता आली नाहीत. या मतदारसंघात समाजवादी पक्षाच्या उमेदवार कांती सिंग विजयी झाल्या आहेत. आता कांती सिंग यांच्या विजयाबरोबरच राजकीय वर्तुळात मिश्रा यांच्या नामुष्कीजनक पराभवाची चर्चा सुरू आहे.

Indu Prakash Mishra wife election defeat
NEET UG Paper leak case : आरोप निश्चित करण्याबाबतचा आदेश CBI न्यायालयाने ठेवला राखून

कोण आहेत इंदू प्रकाश मिश्रा?

लखनौमध्ये राहणारे इंदू प्रकाश मिश्रा हे प्रसिद्ध ज्योतिषी आहेत. गेल्या १९ वर्षांपासून ते एका हिंदी वृत्तवाहिनीवर दररोजचे भविष्य (राशिभविष्य) सांगतात. प्रेक्षकांना राशीनुसार मार्गदर्शन करतात. राशीनुसार जातकाचा दिवस कसा असेल, ग्रहांची स्थिती काय सांगते आणि त्यांनी दिवसभरात काय करावे किंवा काय करू नये, याचा सल्ला देतात. त्यांचा हा नियमित ज्योतिषविषयक कार्यक्रम अत्यंत लोकप्रिय आहे.

Indu Prakash Mishra wife election defeat
PM Modi : "सांगा पाहू, काँग्रेसने किती जागा जिंकल्या असतील?"; विधान परिषद निवडणूक निकालानंतर PM मोदींचा 'इमोजी'तून टोला

राजकीय नेत्याचे राजकीय सल्लागार

अनेक राजकारणी माझ्या पतीकडे येतात, त्यांनी सांगितलेले उपाय करतात, निवडणूक लढवतात आणि यशस्वीही होतात, अशी माहिती स्मिता मिश्रा यांनी दिली. मात्र यंदाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेताना आपण पतीचा सल्ला घेतला नव्हता, असा दावाही त्या करत आहेत. मात्र अन्य राजकीय नेते जर इंदू प्रकाश मिश्रा यांचा सल्ला घेत असतील, तर त्यांच्या स्वतःच्या पत्नीने त्यांच्याशी चर्चा केली नसेल, हे कितपत शक्य आहे?, असा सवाल सोशल मीडियावर उपस्थित केला जात आहे. इंदू प्रकाश मिश्रा स्वतःच्या पत्नीचे भविष्य का सांगू शकले नाहीत, याचे त्यांना आकलन कसे झाले नाही?, अशीही चर्चा सोशल मीडियावर रंगू लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news