India's first Disneyland | गुरुग्राममध्ये साकारणार भारतातील पहिले ‘डिस्नीलँड’? मानेसरजवळ 500 एकरात थीम पार्क उभारण्याची योजना

India's first Disneyland | या थीम पार्कद्वारे हरियाणाला जागतिक पर्यटन केंद्र बनवण्याचा मानस
India's first Disneyland
India's first Disneylandx
Published on
Updated on

India's first Disneyland Gurugram Manesar NCR Haryana Government CM Nayab Singh Saini

नवी दिल्ली : हरियाणा सरकारने देशातील पहिले ‘डिस्नीलँड-शैली’चे थीम पार्क गुरुग्रामजवळ उभारण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला असून, हे उद्यान मानेसरजवळील पचगाव चौकाजवळ 500 एकर जागेवर उभारण्यात येणार आहे.

हे स्थान कुंडली-मानेसर-पलवल (KMP) एक्सप्रेसवे आणि हरियाणा ऑर्बिटल रेल कॉरिडोर (HORC) जवळ असल्यामुळे महत्त्वाचे मानले जात आहे.

डिस्नीलँड भारतात

मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी ही महत्वाची घोषणा दिल्ली येथे केंद्रीय पर्यटन व संस्कृती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर केली होती. हा प्रकल्प हरियाणाच्या अर्थव्यवस्था, रोजगार व पर्यटनाला वाढदायी ठरेल, असे ते म्हणाले होते.

या ‘गेम चेंजिंग’ थीम पार्कद्वारे हरियाणाला जागतिक पर्यटन केंद्र बनवण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.

हा प्रकल्प गुरुग्रामच्या ‘ग्लोबल सिटी’ या 1000 एकरच्या आगामी प्रकल्पाजवळ असल्यामुळे या परिसराचे महत्त्व आणखी वाढणार आहे.

हा प्रकल्प दिल्ली-गुरुग्राम आणि द्वारका एक्सप्रेसवे यांना जोडणाऱ्या मार्गांनी सज्ज असणार असून 'वॉक टू वर्क' संकल्पनेवर आधारित राहणार आहे.

India's first Disneyland
DY Chandrachud residence | माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड अजूनही अधिकृत बंगल्यात; बंगला रिकामा करण्याबाबत सुप्रीम कोर्टाचे केंद्र सरकारला पत्र

आर्थिक आणि सामाजिक फायदे

मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पामुळे हजारो थेट आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होतील, स्थानिक पायाभूत सुविधांचा विकास होईल आणि संपूर्ण परिसराचा कायापालट होईल, असे नमूद केले.

सध्या दिल्ली-एनसीआरमध्ये ‘किंगडम ऑफ ड्रीम्स’ बंद झाल्यामुळे एक मोठे मनोरंजन केंद्र गायब झाले आहे. हे थीम पार्क ती रिकामी जागा भरून काढेल, असेही प्रशासनाने म्हटले आहे.

1989 मध्येही होती अशीच योजना

या प्रकल्पाची कल्पना अगदी नवीन नाही. 1989 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांनी देखील असाच प्रस्ताव दिला होता. मात्र, शेतकऱ्यांच्या विरोधामुळे ती योजना रद्द करण्यात आली होती.

यावेळी भाजपने तेव्हाच्या विरोधाबाबत खुलासा करत सांगितले की, सध्याचा प्रकल्प केवळ 500 एकरवर मर्यादित असून, शेतकऱ्यांच्या हिताची पूर्णतः काळजी घेतली जाईल.

India's first Disneyland
ADR Bihar election SC petition | बिहारमध्ये लाखोंचा मतदान हक्क धोक्यात; मतदार यादीतून वगळण्याची भीती, ADR ची सुप्रीम कोर्टात याचिका

भारताला मिळणार ‘जादुई’ अनुभव

जर हा प्रकल्प प्रत्यक्षात उतरला, तर तो भारतासाठी पर्यटनाच्या दृष्टीने एक ऐतिहासिक टप्पा ठरेल. डिस्नी कंपनीसोबत अधिकृत सहकार्याने भारतात उभा राहणारा हा पहिलाच प्रकल्प असेल.

सध्या चालू असलेली 6 डीस्नेलँड रिसॉर्ट्स

सध्या जगभरात 12 डीस्नेलँड पार्क्स कार्यरत आहेत, जे चार देशांतील 6 रिसॉर्ट कॉम्प्लेक्समध्ये विभागलेले आहेत:

  • कॅलिफोर्निया (यूएस) - Disneyland Park आणि Disney California Adventure

  • फ्लोरिडा (यूएस) - मॅजिक किंग्डम, EPCOT, हॉलीवूड स्टुडिओज, अॅनिमल किंग्डम

  • पॅरिस (फ्रान्स) - डिस्नीलँड पार्क आणि वॉल्ट डिस्नी स्टुडिओज पार्क

  • टोकियो (जपान) - टोकियो डिस्नीलँड आणि टोकियो डिस्नीसी

  • हाँगकाँग - हाँगकाँग डिस्नीलँड

  • शांघाय (चीन) - शांघाय डिस्नीलँड

या पार्क्समधील काही वैशिष्ट्यपूर्ण आकर्षणांमध्ये सिंड्रेला कॅसल, स्टार वॉर्स: गॅलेक्सी एज आणि ट्रॉन लाईटसायकल रन यांचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news