RAC Ticket AC Coach Bedroll: AC बोगीतील RAC प्रवाशांना आता थंडीनं कुडकुडत बसावं लागणार नाही; रेल्वे बोर्डाने पुन्हा आदेश काढला

RAC Ticket AC Coach Bedroll
RAC Ticket AC Coach BedrollPUDHARI
Published on
Updated on

RAC Ticket AC Coach: रेल्वे बोर्डाने AC बोगीतील RAC प्रवाशांना एक मोठा दिलासा दिला आहे. AC चेअर वगळता सर्व AC श्रेणीतील RAC प्रवाशांना आता पूर्ण बेडरोल किट मिळणार आहे. या किटमध्ये चादर, ब्लँकेट, उशी, बेडशीट इत्यादी गोष्टीचा समावेश आहे. याबाबतचा आदेश ४ ऑगस्ट ३०३६ रोजी सर्व झोनल रेल्वेजना देण्यात आले आहेत.

RAC Ticket AC Coach Bedroll
RAC Ticket Fare Refund Recommendation | ‘आरएसी’ला पूर्ण भाडे कशासाठी?

रेल्वे बोर्डाने RAC प्रवाशांना देखील कन्फर्म तिकीट धारक प्रवाशांप्रमाणेच समान सुविधा देण्यावर भर दिला आहे. RAC प्रवाशांना बेडरोल न मिळणे किंवा अपूर्ण बेडरोल मिळण्याच्या तक्रारी विविध माध्यमांतून प्राप्त होत असल्याने रेल्वे बोर्डाने पुन्हा स्पष्ट निर्देश दिले.

RAC Ticket AC Coach Bedroll
Fake railway ticket: २०२४च्या लोकसभा निवडणुकीतील खर्चाच्या नोंदींमध्ये बोगस रेल्वे ई-तिकीट जोडल्याचा संशय

सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी या आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. यापूर्वी 2016, 2017 आणि 2023 मध्ये जारी केलेल्या आदेशांची पुनरावृत्ती करत नव्याने पालन सुनिश्चित करण्यास सांगितले. AC कोचमधील प्रत्येक RAC प्रवाशाला इतर प्रवाशांप्रमाणे संपूर्ण बेडरोल किट उपलब्ध करून देणे बंधनकारक असेल. या निर्णयामुळे RAC तिकीटावर AC प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अधिक आरामदायी प्रवासाचा लाभ मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news