Fake railway ticket: २०२४च्या लोकसभा निवडणुकीतील खर्चाच्या नोंदींमध्ये बोगस रेल्वे ई-तिकीट जोडल्याचा संशय

मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळाकडून IRCTC कडे पडताळणीची मागणी
Railway Ticket
रेल्वे तिकीट (File Photo)
Published on
Updated on

जळगाव : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान सादर करण्यात आलेल्या निवडणूक खर्चाच्या हिशोबात बोगस आणि बनावट रेल्वे ई-तिकीट जोडल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी तात्काळ 'एफआयआर' (FIR) नोंदवून उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी जळगावचे माहिती अधिकार प्रशिक्षक व सामाजिक कार्यकर्ते दीपक कुमार गुप्त यांनी केली होती.

Railway Ticket
Railway ticket scam: रेल्वे तिकिटांचा काळाबाजार; १७ जणांना अटक

या तक्रारीची दखल घेत मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळाने IRCTC ला पत्र लिहून संबंधित तिकिटांची सत्यता पडताळण्याचे निर्देश दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, निवडणूक खर्चाच्या अधिकृत कागदपत्रांमध्ये संशयास्पद रेल्वे तिकिटे जोडण्यात आली असून, यामागे संघटित रॅकेट असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. माहितीच्या अधिकारात (RTI) प्राप्त झालेल्या या तिकिटांच्या प्रती तक्रारीसोबत जोडण्यात आल्या होत्या.

Railway Ticket
Central Railway Ticket: विनातिकीट प्रवाशांकडून 252 कोटींचा दंड वसूल

भुसावळ रेल्वे मंडळाच्या वाणिज्य विभागाचे सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक (ACM) विनय कुमार यांनी ७ जुलै २०२६ रोजी 'आयआरसीटीसी'च्या (IRCTC) पश्चिम विभागाला (मुंबई) पत्र पाठवून या तिकिटांची तातडीने पडताळणी करण्याचे निर्देश दिले आहेत. या तिकिटांची खरी स्थिती स्पष्ट झाल्यानंतर तक्रारदारास पुढील माहिती दिली जाईल, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. या कारवाईमुळे निवडणुकीच्या खर्चात बोगस कागदपत्रे वापरणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news