

Indian Navy recruitment 2025
नवी दिल्ली: भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या भारतीय नौदलाने विविध पदांसाठी भरतीची घोषणा केली आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या सुधारित जाहिरातीनुसार चार्जमन (Ammunition Workshop), फायर इंजिन ड्रायव्हर, फायरमन, ट्रेड्समन मेट आणि पेस्ट कंट्रोल वर्कर या पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.
चार्जमन (Ammunition Workshop): एकूण जागा 9
फायर इंजिन ड्रायव्हर (Fire Engine Driver): या पदासाठी एकूण 18 जागा उपलब्ध असून, विविध कमांड्समध्ये त्यांची विभागणी करण्यात आली आहे.
फायरमॅन (Fireman): या पदासाठी 103 जागांची भरती केली जाणार आहे.
ट्रेड्समन मेट (Tradesman Mate): हे पद जनरल सेंट्रल सर्व्हिस, ग्रुप 'सी', Non-Gazetted आणि औद्योगिक (Industrial) श्रेणीतील आहे. यासाठी एकूण 469 जागा उपलब्ध आहेत.
पेस्ट कंट्रोल वर्कर (Pest Control Worker): या पदासाठी 75 जागांसाठी भरती होणार आहे.
प्रत्येक पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता आणि आरक्षणाचा तपशील जाहिरातीमध्ये देण्यात आला आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात तपासणे आवश्यक आहे. ही भरती प्रक्रिया इंडियन नेव्हल सिव्हिलियन एन्ट्रन्स टेस्ट (INCET-01/2025) अंतर्गत पार पडणार आहे. दरम्यान, 'चार्जमन' या पदाच्या आधीच्या वर्गीकरणातून 'नॉन-इंडस्ट्रियल' (Non-Industrial) हा भाग वगळण्यात आला आहे. त्यामुळे आता हे पद 'जनरल सेंट्रल सर्व्हिस, ग्रुप बी, Non-Gazetted, Non-Ministerial' असे असेल.
वेस्टर्न नेव्हल कमांड, ईस्टर्न नेव्हल कमांड, साउदर्न नेव्हल कमांड तसेच अंदमान-निकोबार कमांड या सर्व ठिकाणी पदांचे वाटप करण्यात आले आहे.
सर्वाधिक जागा ट्रेड्समन मेट या पदासाठी असून तब्बल 469 पदे जाहीर करण्यात आली आहेत.
पदांनुसार सातव्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी लागू राहील.
चार्जमन : लेव्हल-6 (35,400 - 1,12,400)
फायर इंजिन ड्रायव्हर : लेव्हल-3 (21,700 - 69,100)
फायरमन : लेव्हल-2 (19,900 - 63,200)
ट्रेड्समन मेट व पेस्ट कंट्रोल वर्कर : लेव्हल-1 (18,000 - 56,900)
जाहिरातीनुसार माजी सैनिक (ESM) व दिव्यांग (PwBDs) उमेदवारांसाठी देखील आरक्षित जागा ठेवण्यात आल्या आहेत.