Military dog parachute training | आता आकाशातूनही शत्रूवर तुटून पडणार 'श्वान सैनिक'

भारतीय लष्कराकडून पॅराशूट जंपचे विशेष प्रशिक्षण
Military dog parachute training
Military dog parachute training Pudhari pic
Published on
Updated on
Summary
  • जमिनीवरील मोहिमा गाजवल्यानंतर आता लष्कराचे श्वान हवाई मोहिमांसाठीही सज्ज होत आहेत.

  • सेंट्रल कमांडच्या बेहाट ड्रॉप झोनमध्ये पॅराट्रपर, हँडलर आणि श्वानाने एकत्रित यशस्वी 'टैंडम जंप' पूर्ण केली.

  • उच्च तंत्रज्ञानाने सुसज्ज स्मार्ट कॉलर आणि मॉड्यूलर बुलेटप्रूफ जॅकेट्सद्वारे या श्वान योद्ध्यांची सुरक्षा वाढवली जात आहे.

  • विशेष मोहिमांमध्ये सैनिकांचा धोका कमी करणारे हे श्वान 'फोर्स मल्टिप्लायर' म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत.

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

जमिनीवरील अनेक आव्हानात्मक मोहिमा यशस्वीरीत्या पार पाडल्यानंतर आता भारतीय लष्कराचे 'श्वान सैनिक' आकाशातून शत्रूवर झेप घेण्यासाठी सज्ज झाले आहेत. मध्य भारतातील बेहाट ड्रॉप झोनमध्ये एका पॅराटूपरने संपूर्ण युद्ध साहित्यासह डॉग हँडलर आणि त्याच्या श्वानासह विमानातून यशस्वी 'टँडम पॅराशूट जंप' पूर्ण केली. भारतीय सैन्याच्या इतिहासात डॉग हँडलर आणि श्वानाने एकत्रित केलेली ही पहिलीच अशा प्रकारची यशस्वी उडी मानली जात आहे. लष्कराच्या सेंट्रल कमांडने या कामगिरीचे कौतुक करताना, हा जवान आणि श्वानातील अतूट नाते, परस्पर विश्वास आणि लष्करी सज्जतेचा अनोखा पुरावा आहे, असे नमूद केले.

या श्वानांना थेट युद्धभूमीतील परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी अत्यंत खडतर 'बॅटल इनॉक्युलेशन' प्रशिक्षण दिले जाते. बॉम्बस्फोटांचे कानठळ्या बसवणारे आवाज, गोळीबार, धूर आणि रणांगणातील गोंधळातही शांत राहून काम करण्याची सवय त्यांना लावली जाते. आंतरराष्ट्रीय स्तरावरही अशा प्रशिक्षित श्वानांचा वापर केला जातो. अमेरिकेच्या नेव्ही सील्सने ओसामा बिन लादेनविरोधात राबवलेल्या गुप्त मोहिमेतही अशाच एका श्वानाचा समावेश होता.

लष्कराचे 'फोर्स मल्टिप्लायर'

दहशतवादविरोधी कारवाया, सीमा सुरक्षा, स्फोटके आणि भूसुरुंग शोधणे, व्हीआयपी सुरक्षा आणि नैसर्गिक आपत्तींमध्ये बचाव कार्य अशा अनेक आघाड्यांवर हे श्वान मोलाची कामगिरी बजावत आहेत. आकाराने लहान आणि चपळ असल्याने ते सहजपणे शत्रूचे लक्ष्य बनत नाहीत. मानवाला पोहोचणे अशक्य असलेल्या अरुंद ठिकाणी जाऊन ते कॅमेऱ्यांद्वारे सैन्याला थेट माहिती पुरवतात. कर्तव्य बजावताना हौतात्म्य पत्करणाऱ्या श्वानांना पूर्ण लष्करी सन्मानाने अंतिम निरोप दिला जातो, तर काहींना शौर्य पुरस्कारांनीही गौरवण्यात आले आहे.

Military dog parachute training
Terrorists killed Jammu and Kashmir: जम्मु-काश्मीरमध्ये मोठी चकमक; जैश-ए-मोहम्मदचे २ दहशतवादी ठार, अजूनही शोधमोहीम सुरूच

हायटेक सुरक्षा साधने: स्मार्ट कॉलर आणि बुलेटप्रूफ जॅकेट

मोहिमांदरम्यान या श्वानांना अतिविषम हवामान आणि शारीरिक ताणाचा सामना करावा लागतो. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी भारतीय लष्कर हलक्या वजनाची 'मॉड्यूलर बुलेटप्रूफ जॅकेट्स' आणि 'स्मार्ट कॉलर' विकसित करत आहे. नियंत्रण रेषेवर किंवा दहशतवादविरोधी कारवाईत बुलेटप्रूफ जॅकेटमुळे गोळ्या आणि छऱ्यांपासून त्यांचे संरक्षण होईल. त्याच वेळी स्मार्ट कॉलरद्वारे श्वानाचे शरीराचे तापमान, नाडीचे ठोके, श्वसनक्रिया आणि थकव्यावर २४ तास लक्ष ठेवणे शक्य होणार आहे.

Military dog parachute training
PM Narendra Modi 76th Birthday | पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 76 वा वाढदिवस! देशभरात महिनाभर 'सेवा संकल्प अभियान' सुरु

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news