प्रजासत्ताक दिनापूर्वी दहशतवादी हल्ला; लष्करी छावणीवर अंदाधुंद गोळीबार

Jammu Kashmir Terror Attack | कठुआमध्ये जवानांचे चोख प्रत्युत्तर, शोध मोहीम सुरू
Jammu Kashmir Terror Attack
Jammu Kashmir Terror Attack | लष्करी छावणीवर दहशतवाद्यांचा अंदाधुंद गोळीबार; जवानांचे चोख प्रत्युत्तर file photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Jammu Kashmir Kathua Terror Attack | प्रजासत्ताक दिनापूर्वी जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्यातील बिलावरमधील भातोडी आणि मुआर भागातील भारतीय लष्कराच्या छावणीवर शुक्रवारी रात्री दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. जवानांनी त्याला चोख प्रत्युत्तर दिले. छावणीवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना ठार करण्यासाठी सध्या शोध मोहीम सुरू असून संपूर्ण परिसराला घेराव घालण्यात आला आहे.

शुक्रवारी, बीएसएफ वेस्टर्न कमांडचे एडीजी सतीश खंदारे यांनी प्रजासत्ताक दिनापूर्वी कठुआ जिल्ह्यातील भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवरील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. त्यांनी बीएसएफ आउट पोस्ट बोबिया येथील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला आणि सैनिकांचे मनोबल वाढवले. प्रजासत्ताक दिनी सैनिकांना बॉर्डरवर कडक नजर ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. नद्या आणि नाल्यांवर विशेष लक्ष ठेवण्यास सांगितले. बीएसएफने अलीकडेच जम्मू ते कठुआपर्यंत बोगदाविरोधी ऑपरेशन केले. त्यामुळे ३३ किलोमीटरच्या आंतरराष्ट्रीय सीमेवरून घुसखोरीची शक्यता नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news