

पुढारी ऑनलाईन डेस्क: Jaguar crashed | भारतीय हवाई दलाचे जग्वार लढाऊ विमान आज (दि.७) हरियाणातील अंबाला येथे कोसळले. विमानाने अंबाला एअरबेसवरून प्रशिक्षणादरम्यान उड्डाण करत असताना हा अपघात झाल्याचे वृत्त 'ANI'ने दिले आहे.
हरियाणातील पंचकुला मोरनी येथील बालदवाला गावाजवळ शुक्रवारी (दि.७) भारतीय हवाई दलाचे जग्वार लढाऊ विमान कोसळले. भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, विमानाने अंबाला एअरबेसवरून प्रशिक्षण उड्डाणासाठी उड्डाण केले होते. दरम्यान हा अपघात झाला. वैमानिकाच्या हे लक्षात येताच त्यांना पॅराशूटच्या साहाय्याने विमानातून उडी मारून स्वत:चा जीव वाचवला.
प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, विमान गडगडत झाडांवर आदळले आणि जंगलाच्या मध्यभागी असलेल्या एका खड्ड्यात पडले. विमान पडताच त्याला आग लागली आणि त्याचे अनेक तुकडे झाले. विमानाचे तुकडे आजूबाजूच्या परिसरात विखुरलेले आढळले. भारतीय हवाई दलाच्या विमानामध्ये उड्डाणादरम्यान बिघाड झाल्याने हा अपघात झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश देखील भारतीय हवाई दलाने दिल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.