India @ 75 : सुखदेव यांच्‍या ‘त्‍या’ कामगिरीमुळे चंद्रशेखर आझादही झाले हाेते थक्‍क! | पुढारी

India @ 75 : सुखदेव यांच्‍या 'त्‍या' कामगिरीमुळे चंद्रशेखर आझादही झाले हाेते थक्‍क!

पुढारी ऑनलाईन डेस्क : ब्रिटिशांची अन्‍यायकारक राजवट उलथविण्‍यासाठी  क्रांतिकारकांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षणही घेतले होते. यामध्येच एक होते सुखदेव. हो, तेच सुखदेव जे भगतसिंग, राजगुरू यांच्यासोबत वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी देशासाठी फासावर चढले. क्रांतीच्या अनेक कारवायांमध्ये पुढे असणाऱ्या सुखदेवांच्याकडे एक विशेष कला होती आणि ती म्हणजे बॉम्ब बनवण्याची.

बालपणीच घेतली चंद्रशेखर आझाद यांची भेट

भगतसिंग यांचे चुलतभाऊ असणारे सुखदेव यांचे पूर्ण नाव सुखदेव रामलाल थापर.  त्‍यांचा जन्म पंजांब मधील लुधियाना शहरातील नौघारा मोहल्ला येथील. १५ मे १९०७ मध्ये जन्मलेल्या सुखदेवांनी लहानपणापासूनच ब्रिटिशांचा अत्याचार आणि जुलमी राजवट बघितली होती. बालपणी त्‍यांनी  देता चंद्रशेखर आझाद यांची भेट घेतली. यावेळी देशसेवेची इच्छा व्‍यक्‍त करत त्‍यांनी सुखदेव त्यांच्या संस्थेत दाखल झाले. यानंतर बॉम्ब कसा बनवावा, त्याचे रसायन कुठे मिळते याबद्दल माहिती घेण्यासाठी त्यांनी अनेक पुस्तके वाचली.

… आणि बाॅम्‍बची चाचणी यशस्‍वी झाली

लाहोर मधील काश्मीर बिल्डिंगमध्ये एक खोली भाड्याने घेतली, जिथे ते वेगवेगळे प्रयोग करत असत. याठिकाणी चंद्रशेखर आझाद, भगतसिंगही येत, यावेळी येथे सुखदेवांच्या कामाबरोबर अनेक चर्चाही होत. सुखदेव यांचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर याची चाचणी घेण्यासाठी आझाद, भगतसिंग आदी क्रांतिकारक लाहोर शहरापासून दूर अंतरावरील निर्मनुष्य ठिकाणी पोहचले. याठिकाणी त्यांची चाचणी यशस्वी झाल्यानंतर आझादांनी त्यांनी पाठ थोपटली. यानंतर सर्वजण पुढील योजनांच्‍या नियाेजनासाठी सज्‍ज झाले.

लाहोर येथे ‘नौजवान भारत सभा’

सुखदेवांनी इतर नामवंत क्रांतिकारकांसह लाहोर येथे ‘नौजवान भारत सभा’ ​​सुरू केली. जिथे प्रामुख्याने तरुणांना स्वातंत्र्यलढ्यासाठी तयार करणे आणि जातीयवादाचा अंत करणे आदी कामे केली जात असत. तसेच लाहोरमधील नॅशनल कॉलेजमध्ये त्यांनी तरुणांना शिक्षण दिले आणि त्यांना भारताच्या गौरवशाली भूतकाळाबद्दल खूप प्रेरणा दिली.

२३ मार्च १९३१ राेजी भगतसिंग, सुखदेव थापर आणि शिवराम राजगुरू यांना फाशी दिल्यानंतर क्रांतीची आग देशभर पसरूनये म्हणून ब्रिटिशांकडून त्यांच्या मृतदेहांवर सतलज नदीच्या काठावर गुप्तपणे अंत्यसंस्कार केले.

हेही नक्की वाचा. 

Back to top button