खलिस्तानवाद्यांच्या मुसक्या आवळणार

खलिस्तानवाद्यांच्या मुसक्या आवळणार

नवी दिल्ली :  विदेशातून भारतात दहशतवादी कारवाया करणार्‍या खलिस्तानवाद्यांच्या मुसक्या आवळण्याची तयारी भारत सरकारने केले आहे. ब्रिटन आणि अमेरिकेतील सॅनफ्रान्सिस्कोमधील भारतीय दूतावासावर हल्ला करणार्‍या 19 खलिस्तानावाद्यांची एनआयएने ओळख पटवली आहे.

19 मार्च रोजी 45 खलिस्तानवाद्यांनी ब्रिटनमधील भारतीय दूतावासावर हल्ला केला होता. सॅनफ्रान्सिस्कोमधील भारतीय दूतावासावर हल्ला करणार्‍या 4 खलिस्तानवाद्यांची एनआयएला ओळख पटली आहे. यासाठी एनआयएने खलिस्तानवाद्यांना ताब्यात घेण्यासाठी तयारी केली आहे. 'शीख फॉर जस्टीस'शी संबंधित असलेल्या खलिस्तानवाद्यांनी दहशतवादी हरदिप सिंग याची हत्या झाल्यानंतर सॅनफ्रान्सिस्कोतील 2 जुलै रोजी भारतीय दूतावासात आग लावली होती.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news