

India US Trade Deal: भारत आणि अमेरिका यांच्यातील ट्रेड डीलचे स्ट्रक्चर फायनल करण्यात आलं आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी यावर स्वाक्षरी देखील केली आहे. यानंतर आज (दि. ७ फेब्रुवारी) रोजी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांनी पत्रकार परिषद घेत या डीलमधील प्रमुख गोष्टी सर्वांसमोर ठेवल्या. या व्यापार करारानंतर भारतातून आमेरिकेत निर्यात करण्यात येणाऱ्या अनेक वस्तूंवर १८ टक्के टॅरिफ लारणार आहे. याचबरोबर या करारामध्ये अनेक गोष्टींवर झिरो टॅरिफ लागणार आहे.
पियूष गोयल यांनी सरकारने हा करार करताना शेतकऱ्यांचे हीत सर्वोच्च ठेवले आहे. या करारामुळं भारतातील कृषी उत्पादनांना कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय अमेरिकेत प्रवेश मिळणार आहे. याचबरोबर या करारामुळं शेतकऱ्यांचे कोणतेही नुकासन होऊ नये याची देखील काळजी घेतली आहे.
गोयल म्हणाले की, 'चहा, मसाले, कॉफी, नारळाचं तेल, कोपरा आणि वनस्पती मेण या सारखी उत्पादनांवर अमेरिका कोणतेही शुल्क लावणार नाही. त्याचबरसोबर केळ, अंबा, पेरू, एव्हाकाडो, किवी, पपई, अननस, मशरूम, कंदमुळं, धान्य, बेकरी उत्पादने, कोको उत्पादन, तिळ, खसखस आणि तुरट रसाचे फळे, भाज्या आणि कृषी उत्पादनावर अमेरिका कोणताही कर लावणार नाही. याचबरोबर जेम्स अँड डायमंड, फार्मा, स्मार्टफोन यांचा देखील झिरो टॅरिफ यादीत समावेश आहे.
पियूष गोयल यांनी सांगितलं की आम्ही अमेरिकेच्या कोणत्याही डेअर प्रोडक्ट्सवर सूट दिलेली नाही. तसेच कृषी क्षेत्रातील सर्व उत्पादनांवर सूट दिलेली नाही. आम्ही आपल्या शेतकऱ्यांच्या हिताचा सर्वात आधी विचार केला आहे.
ते म्हणाले, 'मीट, साखर, पॉल्ट्री, डेअरी, सोयाबीन, मका, तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी, फळ, ग्रीन टी, कोका, शेंगदाणे, अॅनिमल सीड्स प्रोडक्ट, नॉन अल्कोहोलिक वस्तू, इथेनॉल, तंबाकू या सर्व वस्तूंवर अमेरिकेला कोणतीही सूट देण्यात आलेली नाही.