सायबर गुन्ह्यांच्या तपासाबाबत भारत- अमेरिकेत सामंजस्य करार

India-US Relation | परराष्ट्र मंत्रालयाने एक्स पोस्टवरून दिली माहिती
India-US Relation
India-US Relation |सायबर गुन्ह्यांच्या तपासाबाबत भारत- अमेरिकेत सामंजस्य करारFile Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क: भारत आणि अमेरिका संबंध अधिक बळकट होण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे. दोन्ही देशात सायबर आणि डिजिटल गुन्हेगारीबाबतची माहिती देवाणघेवाण संबंधी आज (दि.१८) महत्त्वपूर्ण करार पार पडला. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने नुकतीच माहिती दिल्याचे वृत्त एएनआयने एक्स अकाऊंटवरून दिले आहे.

सायबर, डिजिटल गुन्हेगारीची माहिती एकमेकांना देणार

"गुन्हेगारी तपासात सायबर धोक्याची गुप्तचर यंत्रणा आणि डिजिटल फॉरेन्सिक्सवर सहकार्य आणि माहितीच्या देवाणघेवाणीसाठी भारत-अमेरिका एकत्र आले आहेत," त्यांनी सायबर गुन्ह्यांच्या तपासाबाबत सामंजस्य करारावर भारत आणि अमेरिकेने स्वाक्षरी केल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी ट्विट केले.

वॉशिंग्टन डीसी येथे करारावर स्वाक्षरी

"सायबर गुन्ह्यांच्या तपासाबाबतच्या सामंजस्य करारावर अमेरिकेतील भारतीय राजदूत विनय मोहन क्वात्रा आणि अमेरिकेच्या गृह सुरक्षा उपसचिव क्रिस्टी कॅनेगालो यांनी वॉशिंग्टन डीसी येथे करारावर स्वाक्षरी केली", असे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news