

पुढारी ऑनलाईन डेस्क: भारताने बुधवारी (दि.२४ जुलै) आपल्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीची आणखी एक यशस्वी चाचणी घेतली. या चाचणीत भारताने हे दाखवून दिले की ते 5000 किलोमीटर अंतरावरून येणाऱ्या शत्रूच्या क्षेपणास्त्रांना रोखू शकतात. हे तंत्रज्ञान पूर्णपणे भारतात विकसित करण्यात आले आहे, असेही संरक्षण मंत्रालयाने सांगितले आहे.
भारताने बुधवारी आपल्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीच्या दुसऱ्या टप्प्याची यशस्वी चाचणी घेतली. यादरम्यान, 5,000 किलोमीटरच्या पल्ल्याच्या शत्रूच्या क्षेपणास्त्रांपासून बचाव करण्यासाठी स्वदेशी विकसित क्षमतेचे प्रात्यक्षिक करण्यात आले. संरक्षण मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. मंत्रालयाने एका प्रकाशनात म्हटले आहे की, बॅलिस्टिक क्षेपणास्त्र उड्डाण चाचणी दरम्यान सर्व चाचणी लक्ष्यांपैकी 100 टक्के लक्ष्य साध्य केले गेले. संपूर्ण नेटवर्क-केंद्रित युद्ध शस्त्र प्रणालीचे उद्दिष्टय यामुळे साध्य करणे शक्य होणार आहे. या क्षेपणास्त्राची एकात्मिक चाचणी श्रेणी (ITR) चाचणी ओडिशातील चांदीपूर येथील करण्यात आली.
बॅलेस्टिक क्षेपणास्त्र यशस्वी उड्डाण चाचणीसाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) कौतुक केले आहे. ते म्हणाले की, या चाचणीने भारताची बॅलेस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण क्षमता पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. मंत्रालयाने सांगितले की, 'DRDO ने बुधवार 24 जुलै रोजी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीच्या दुसऱ्या टप्प्याची यशस्वी चाचणी केली.