

India Pakistan Tension
नवी दिल्ली : भारत आणि पाकमधील वाढत्या तणावानंतर देशभरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील ऐतिहासिक वास्तूंची सुरक्षा वाढवली आहे. इंडिया गेट, लाल किल्ला आणि कुतुबमिनारजवळ सुरक्षा वाढवण्यासाठी अतिरिक्त पोलिस बळ तैनात केले आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षा वाढवण्यात आली आहे आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे देखरेख केली जात आहे.
दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ऐतिहासिक इमारतींबाहेर नेहमीच कडक सुरक्षा व्यवस्था असते. मात्र, सीमेवरील तणाव लक्षात घेता, दिल्लीच्या विविध भागात सुरक्षा आणखी वाढवण्यात आली आहे. दिल्लीतील ऐतिहासिक वास्तू पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येतात आणि त्यामुळेच दिल्ली पोलिसांनी खबरदारी म्हणून हे पाऊल उचलले आहे.