India Pakistan Conflict | परराष्ट्र मंत्री जयशंकर यांच्याशी अमेरिकेच्‍या परराष्ट्र मंत्र्यांनी केली चर्चा

दोन्ही बाजूंनी तणाव कमी करण्याचा अमेरिकेचा प्रयत्न
India Pakistan Conflict
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो. दुसर्‍या छायाचित्रात भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर.File Photo
Published on
Updated on

India Pakistan Conflict

पहलगाम दहशतवादी हल्‍ल्‍यानंतर भारताने ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्‍तानला सडेतोड प्रत्युत्तर दिलं. यानंतर दोन्‍ही देशांमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. हा तणाव निवळावा या हेतूने अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याशी चर्चा केली.

जयशंकर यांच्‍याशी साधला फोनवर संवाद

ऑपरेशन सिंदूर राबवत भारताने पाकिस्‍तानमधील ९ दहशतवादी तळ उद्‍ध्‍वस्‍त केली. यानंतर पाकिस्तानकडून भारतीय भूभागांवर ड्रोनने सतत हल्ले केले जात आहेत. भारताकडूनही हे सर्व ड्रोन हल्‍ले परतवले जात आहेत. दरम्‍यान, मार्को रुबियो यांनी जयशंकर यांना फोन केला, 'भारत आणि पाकिस्तानने संघर्ष कमी करण्याचे मार्ग ओळखावेत', तणाव कमी करण्‍यासाठी अमेरिका मदतीस तयार आहे, असेही ते म्‍हणाले.

तणाव कमी करण्‍यासाठी थेट संवादाचे आवाहन

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते टॅमी ब्रूस म्हणाले की, दोन्ही बाजूंनी तणाव कमी करण्यासाठी आणि गैरसमज टाळण्यासाठी थेट संवाद पुन्हा स्थापित करण्याचे मार्ग ओळखावेत यावर सचिव रुबियो यांनी भर दिला. भविष्यातील वाद टाळण्यासाठी त्यांनी रचनात्मक संवादात अमेरिकेला मदत करण्याची ऑफर दिली आहे.

India Pakistan Conflict
Asim Munir : युद्धपिपासू असीम मुनीर कोण आहेत? जाणून घ्‍या पाकिस्तानच्या वादग्रस्त लष्करप्रमुखांबद्दल

'भारत-पाकिस्तानमधील तणाव 'शक्य तितक्या लवकर' कमी झाला पाहिजे'

व्हाईट हाऊसने शुक्रवारी म्हटले होते की अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भारत आणि पाकिस्तानमधील तणाव "शक्य तितक्या लवकर" कमी करायचा आहे. पत्रकार परिषदेत व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट म्हणाल्या की, अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष डोनाल्‍ड ट्रम्‍प यांनीहे स्पष्ट केले आहे की, भारत आणि पाकिस्‍तानमधील तणाव लवकरात लवकर कमी करायचा आहे.

India Pakistan Conflict
Operation Sindoor impact : भारताच्‍या तडाख्‍याने पाकिस्‍तान धास्‍तावले, 'PSL'चे १० सामने कराचीत हलवले

पाकिस्‍तानच्‍या आगळीकीला भारत चोख प्रत्‍युत्तर देईल

व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी म्‍हटलं आहे की, राष्‍ट्राध्‍यक्ष डोनाल्‍ड ट्रम्प यांचे दोन्ही देशांच्या नेत्यांशी चांगले संबंध आहेत. दोन्ही देशांच्या नेत्यांशी सतत संपर्कात आहेत. एस जयशंकर यांनी रुबियो यांना सांगितले की, परिस्थिती चिघळवण्याच्या पाकिस्तानच्या कोणत्याही प्रयत्नांना भारत जोरदार प्रत्युत्तर देईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news