India's offer to IRIS Dena |अमेरिकेने हल्‍ला करण्‍यापूर्वी इराणी जहाजाला भारतीय नौदलाने देऊ केला होता आश्रय

श्रीलंकेच्या गॅले बंदरापासून जवळ असताना असताना अमेरिकेने केली होती कारवाई
India's offer to IRIS Dena
श्रीलंकन नौदलाचे जवान इराणच्या 'देना' या युद्धनौकेवरील खलाशांची सुटका करताना. pti photo.
Published on
Updated on
Summary

२८ फेब्रुवारीला इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यांनंतर श्रीलंकेच्या गॅले बंदरापासून २० नॉटिकल मैल अंतरावर इराणची युद्धनौका अमेरिकेने लक्ष्‍य केली होती.

India's offer to IRIS Dena

विशाखापट्टणम येथील 'मिलान-२०२६' युद्धसरावात सहभागी होऊन परतणाऱ्या इराणच्या 'आयआरआयएस देना' या युद्धनौकेला ४ मार्च रोजी श्रीलंकेजवळ अमेरिकन पाणबुडीने टॉर्पेडोने बुडवले. अमेरिका आणि इराणमधील वाढत्या संघर्षामुळे भारताने या नौकेला सुरक्षित आश्रयाची ऑफर दिली होती, असे वृत्त 'द इंडियन एक्सप्रेस'ने दिले आहे.

तांत्रिक बिघाडामुळे इराणची दुसरी युद्धनौका कोची बंदरात दाखल

२८ फेब्रुवारी रोजी इस्रायल आणि अमेरिकेने संयुक्‍तपणे इराणवर हवाई हल्‍ला केला. यानंतर श्रीलंकेच्या गॅले बंदरापासून २० नॉटिकल मैल अंतरावर इराणची युद्धनौका अमेरिकेने लक्ष्‍य केली होती. याचदिवशी इराणची 'आयआरआयएस लावन' ही दुसरी युद्धनौका तांत्रिक बिघाडामुळे कोची बंदरात बचावासाठी पोहोचली. इराणच्या विनंतीनुसार, भारत सरकारने १ मार्च रोजी या जहाजाला आपल्या बंदरात येण्याची परवानगी दिली होती. ४ मार्च रोजी हे जहाज कोचीला पोहोचले असून, त्यावरील १८३ कर्मचाऱ्यांना भारतीय नौदलाच्या सुरक्षित छायेत ठेवण्यात आले असल्‍याचेही सूत्रांनी स्‍पष्‍ट केले आहे.

India's offer to IRIS Dena
Israel Iran war: इस्त्रायलचे 'ब्रह्मास्त्र': ब्लू स्पॅरो म्हणजे काय? ज्याने थेट अंतराळातून येऊन खामेनींना ठार केलं

'आयआरआयएस लावन' युद्धनौका ४ मार्चपासून कोची बंदरातच

इराणी युद्धनौकांना दिलेल्या आश्रयाबाबत भारतीय नौदलाकडे ईमेलच्‍या माध्‍यमातून विचारणा करण्‍यात आली असताना सरकारी सूत्रांनी स्पष्ट केले की, इराणची 'आयआरआयएस लावन' ही युद्धनौका ४ मार्चपासून कोची बंदरातच थांबलेली आहे. तसेच विशाखापट्टणम येथील 'मिलान-२०२६' युद्धसरावात सहभागी होऊन परतणाऱ्या इराणच्या 'आयआरआयएस देना' या युद्धनौकेला ४ मार्च रोजी श्रीलंकेजवळ अमेरिकन पाणबुडीने टॉर्पेडोने बुडवले. तत्‍पूर्वी भारताने या नौकेला सुरक्षित आश्रयाची ऑफर दिली होती.

India's offer to IRIS Dena
US-Israel-Iran War : आखाती देशातून आतापर्यंत 2730 प्रवासी परतले!

श्रीलंकेकडून इराणच्या 'बुशेहर' युद्धनौकेला आश्रय

श्रीलंका सरकारने इराणच्या 'आयआरआयएस बुशेहर' या युद्धनौकेला आपल्या बंदरात येण्याची परवानगी दिली आहे. ही परवानगी अशा वेळी दिली गेली जेव्हा 'आयआरआयएस देना' या युद्धनौकेने धोक्याचा इशारा दिल्यानंतर श्रीलंकेच्या नौदलाने मोठे बचाव कार्य राबवले. या मोहिमेत आतापर्यंत ३२ कर्मचाऱ्यांना सुखरूप वाचवण्यात आले असून, ८७ जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. जहाजावरील एकूण १८० कर्मचाऱ्यांपैकी अजूनही ६० जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे.

India's offer to IRIS Dena
Iran Israel Conflict: इराण-इस्रायल युद्धाचे परिणाम भारतात; पुण्यात व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा थांबवला, महागाई वाढणार

बेपत्ता इराणी खलाशांच्या शोधासाठी भारतीय नौदलाने राबवली शोधमोहीम

इराणच्या 'आयआरआयएस देना' या युद्धनौकेवरील बेपत्ता कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासाठी भारतीय नौदलाने शोध मोहिम बारवली आहे. नौदलाने या मोहिमेसाठी 'P8I' हे लांब पल्ल्याचे गस्ती विमान आणि 'आयएनएस तरंगिनी' ही नौका घटनास्थळी तैनात केली आहे. 'आयएनएस इक्षक' ही युद्धनौका देखील कोची बंदरातून तातडीने रवाना झाली आहे. आरएनएस इक्षक समुद्रामध्ये शोधकार्य करत आहे. शोध मोहिमेचा एक भाग म्‍हणून समुद्रात जीव रक्षक नौका टाकण्यासाठी आणखी एक विमान सज्ज ठेवण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news