Housing Sales: मुंबई-पुण्यात घरखरेदीला ब्रेक? पुण्यात १६ टक्के, मुंबईत ८ टक्के घट

जुलै-सप्टेंबरमध्ये देशातील नऊ मोठ्या शहरांत घरांची विक्री ६ टक्क्यांनी घटून १.०३ लाखांवर आली; मुंबईत ८%, पुण्यात १६% घट.
Housing Market
Housing Marketpudhari photo
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली: मुंबई, दिल्ली, पुण्यासह देशातील नऊ मोठ्या शहरांमध्ये जुलै ते सप्टेंबर या कालावधीत घरांची विक्री सहा टक्क्यांनी घटून १ लाख ३ हजारांवर आली. तसेच, नवीन घरांचा पुरवठाही घटला आहे.

अमेरिका आणि इराण युद्धामुळे कच्च्या तेलाच्या भावात झालेली वाढ, विस्कळीत झालेला व्यापार, एल-निनोचा प्रभाव यामुळे अनिश्चितता वाढली आहे.

मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नवी दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, पुणे आणि कोलकाता येथील घरांची विक्री घटली असल्याचे प्रॉपइक्विटीच्या अहवालात म्हटले आहे. गतवर्षी याच कालावधीत १ लाख ९ हजार ४२० घरांची विक्री झाली होती.

यंदा त्यात १ लाख ३ हजार १७० पर्यंत घट झाली आहे. तसेच, नवीन घरांचा पुरवठा १ लाख ३३० वरून ९८,१६५ वर आला आहे. नवरात्र, दसरा आणि दिवाळीच्या कालावधीत घरांची विक्री वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

Housing Market
PM Mementos E-Auction: पंतप्रधानांच्या वस्‍तूंच्‍या ई-लिलावात महाराष्ट्राशी संबंधित ८९ स्मृतिचिन्हे

जुलै ते सप्टेंबर या कालावधीत बंगळुरू येथील घरांची विक्री गतवर्षीच्या तुलनेत १७,१७० वरून १७,३४० वर घसरली आहे. हैदराबाद येथील घरांची विक्री १३,८९० वरून १५,४७० वर वधारली. मुंबई महानगर प्रदेशात ठाण्यामधील घरांची विक्री ११ टक्क्यांनी घसरून १६,२३० वर आली.

गतवर्षी याच कालावधीत १८,२४० घरांची विक्री झाली होती. नवी दिल्लीतील घरांची विक्री १२ टक्क्यांनी घटून ८ हजार ९० वर आली आहे. गतवर्षी दिल्लीत ९,२३० घरांची विक्री झाली होती. चेन्नईतील घरांची विक्री १७ टक्क्यांनी घटून ४,६८९ वर आली आहे. गतवर्षी चेन्नईत ५,६४० घरांची विक्री झाली होती. कोलकाता येथील घरांची विक्री ४,६४० वरून ३,८६०वर (१७ टक्के घट) आली आहे.

Housing Market
CJP Protest Mumbai: शिवाजी पार्कमध्ये CJPच्या आंदोलनाला ब्रेक; मुंबई पोलिसांनी परवानगी का नाकारली? सांगितली ४ महत्त्वाची कारणं

मुंबई-पुण्यातील विक्री घसरली...

जुलै ते सप्टेंबर या तिमाहीतील मुंबईतील घरांची विक्री १०,६९० वरून ९,८३० वर आली. त्यात आठ टक्क्यांची घट झाली आहे. नवी मुंबईतील घरांची विक्री ८,७३० वरून ९,८१० झाली. गतवर्षीच्या तुलनेत घरांची विक्री १२ टक्क्यांनी वाढली. पुण्यातील घरांची विक्री २१,१९० वरून १७,८६० वर घटली आहे. गतवर्षीच्या तुलनेत शहरातील विक्री १६ टक्क्यांनी घसरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news