

Indian Missile Defense, S-400 Range and Power
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला भारताने घेतला असून, भारतीय सेनेने पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भारताच्या सशस्त्र दलांनी पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळांचा नाश केला आहे. दरम्यान, भारतीय सेनेने आणखी एक मोठी कामगिरी केली आहे. भारतीय सेनेने ७ आणि ८ मे २०२५ च्या रात्री पाकिस्तानकडून ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी श्रीनगर, जम्मू, अवंतीपुरा, अमृतसर, कपूरथला, पठाणकोट, जालंधर, लुधियाना, आदमपूर, चंदीगड, नल, भटिंडा, फलोदी, भुज अशा अनेक महत्त्वाच्या लष्करी ठिकाणांवर हल्ला करण्याचा प्रयत्न उधळून लावला. यावेळी भारताने प्रथमच अत्याधुनिक एस-४०० क्षेपणास्त्र प्रणालीचा वापर केला.
'एस-४००' ही रशियन बनावटीची मिसाईल डिफेन्स सिस्टीम आहे, जी जगातील सर्वाधिक प्रभावी प्रणालीपैकी एक मानली जाते. ऑक्टोबर २०१८ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या भेटीत भारताने ही प्रणाली विकत घेण्याचा करार केला होता. भारताने पाच युनिटसाठी सुमारे ५ अब्ज डॉलरचा (सुमारे ४०,००० कोटी रुपये) करार केला होता. एस-४०० ची वैशिष्ट्ये मारा रेंज ४० कि.मी. ते ४०० कि.मी. पर्यंत. सतत हालचाल शक्य असल्यामुळे शत्रूपासून लपवणे सोपे. ७२ मिसाईल्स एका वेळी डागण्याची क्षमता.
अतिशय कमी तापमानात म्हणजेच ५०° C ते ७०° C पर्यंतही कार्यक्षम, १०० फूट ते ४०,००० फूट उंचीवर असलेले लक्ष्य भेदण्यास सक्षम, अत्याधुनिक रडार प्रणालीमुळे कोणतीही हवाई घुसखोरी अचूक ओळखता येते. एस-४०० प्रणाली पाकिस्तान व चीनच्या वाढत्या हवाई धोका लक्षात घेता तैनात करण्यात आहे. ही प्रणाली अत्याधुनिक फायटर जेटस्लाही नष्ट करू शकते आणि भारताच्या हवाई सुरक्षेसाठी एक अभेद्य कवच सिद्ध होत आहे.
S-400 प्रणाली वेगवेगळ्या प्रकारच्या क्षेपणास्त्रांसह कार्य करते, त्यामुळे ती विविध अंतरांवरून येणाऱ्या धोक्यांचा सामना करू शकते :
40 N6 मिसाईल ४०० कि.मी. अंतरावर
टार्गेट नष्ट करण्याची क्षमता
48 N6 मिसाईल: २५० कि.मी.
9 M96 E2 मिसाईल १२० कि.मी.
9 M96 E मिसाईल : ४० कि.मी.
३६०" कव्हरेज : एकाच वेळी ८० टार्गेटस्वर लक्ष ठेवून ३६ टार्गेटस्वर मारा करू शकते मल्टी लेयर डिफेन्स : विविध स्तरांवर संरक्षण, म्हणजे एकाच वेळी वेगवेगळ्या अंतरावरून येणारे धोके रोखणे शक्य
ट्रॅकिंग क्षमता : ६०० कि. मी. पर्यंत टार्गेट
पाकिस्तान व चीनच्या शस्त्रास्त्रांना उत्तर देण्यासाठी अत्यंत उपयुक्त
बॅलिस्टिक मिसाईल, फाईटर जेटस् व ड्रोन्स यांना वेळीच नष्ट करण्याची ताकद
दिल्ली, मुंबई, लडाख, पंजाब यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी तैनात