India Alliance Rally : 'इंडिया' आघाडीच्या रॅलीमुळे १०,००० कोटी रुपयांचे नुकसान ; दिल्लीतील व्यापारी संघटनेचा आरोप

रॅलीच्या ठिकाणाजवळील सुमारे ३ लाख दुकानांपैकी ८० टक्के दुकाने बंद
India Alliance Ramlila Maidan rally Delhi traders loss
India Alliance Rally File Photo
Published on: 
Updated on: 

India Alliance Ramlila Maidan rally Delhi traders loss : दिल्लीतील रामलीला मैदानावर रविवारी (दि. १ नोव्हेंबर) निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमितता आणि ‘एसआयआर’विरोधात ‘इंडिया’ आघाडीच्या वतीने महारॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमुळे निर्माण झालेल्या अडथळ्यांमुळे दिल्लीतील २० ते २५ प्रमुख बाजारपेठांमधील सुमारे २.५ लाख दुकाने बंद राहिली. व्यापाऱ्यांच्या मते, यामुळे त्यांना १०,००० ते ११,००० कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागले, असा आरोप 'चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्री'ने केला आहे.

रॅलीच्या ठिकाणाजवळील सुमारे ३ लाख दुकानांपैकी ८० टक्के दुकाने बंद

'चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्री' (CTI) चे अध्यक्ष ब्रिजेश गोयल यांनी सांगितले की, रॅलीच्या ठिकाणाजवळील बाजारपेठारांमधील सुमारे ३ लाख दुकानांपैकी ८०% दुकाने बंद होती. वाहतुकीवरील निर्बंध, गर्दी आणि मोठ्या संख्येने लोक येण्याची शक्यता असल्याने व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवणे पसंत केले. या गोंधळामुळे राष्ट्रीय राजधानीच्या आसपासच्या शहरांतून येणारे ग्राहक, पुरवठादार आणि विक्रेते यांच्या येण्या-जाण्यावरही परिणाम झाला.

India Alliance Ramlila Maidan rally Delhi traders loss
Plane Crash : “अरे देवा, आपली वेळ संपली...!” : अमेरिकेत विमानाला भीषण अपघात, ९ जणांचा मृत्यू

२० ते २५ प्रमुख बाजारपेठांवर परिणाम

गोयल यांनी दावा केला आहे की, व्यवसायानिमित्त दिल्लीत येणारे सुमारे ३ ते ४ लाख लोक येऊ शकले नाहीत, तर टेम्पो आणि ट्रकसह सुमारे ५,००० वाहने जुनी दिल्ली (Old Delhi) आणि मध्य दिल्लीतील बाजारपेठांपर्यंत माल पोहोचवू शकली नाहीत. रामलीला मैदानावर झालेल्या रॅलीमुळे परिसरातील २० ते २५ प्रमुख बाजारपेठांवर परिणाम झाला. 'कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स' (CAIT) शी संबंधित विविध बाजारपेठांमधील व्यापाऱ्यांच्या व्हॉट्सॲप ग्रुप्सकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सुमारे ८०% दुकाने—म्हणजेच ३ लाखांपैकी सुमारे २.५ लाख दुकाने बंद राहिली.

नुकसान भरपाई कोण देणार?

महारॅलीमुळे मालाची ने-आण आणि चढ-उतार पूर्णपणे विस्कळीत झाले. दिवाळीच्या मुख्य हंगामात, या बाजारपेठांमध्ये एकत्रितपणे १०,००० ते १२,००० कोटी रुपयांचा व्यवसाय होतो. आता व्यवसायात आलेल्या या व्यत्ययाबद्दल व्यापाऱ्यांना भरपाई कोण देणार?, असा सवालही गोयल यांनी केला आहे.

India Alliance Ramlila Maidan rally Delhi traders loss
Mahadev Betting App : महादेव ॲपचा 'मास्टरमाइंड' भारताच्या ताब्यात; कसा चालायचा ६ हजार कोटींच्या 'बेटिंग'चा खेळ?

व्यापाऱ्यांनी नुकसानीचा दिला होता इशारा

या मेळाव्याच्या आधी, दिल्लीतील अनेक प्रमुख व्यापारी केंद्रांमधील व्यापाऱ्यांनी दिवाळीच्या खरेदीच्या हंगामात रामलीला मैदानावर रॅली आयोजित करण्याला विरोध दर्शवला होता. त्यांनी वाहतूक कोंडी आणि निर्बंधांमुळे घाऊक बाजारपेठा विस्कळीत होऊ शकतात आणि हजारो रोजंदारी कामगारांच्या उपजीविकेवर परिणाम होऊ शकतो, असा इशारा दिला होता.

रॅलीच्या वेळेवर आणि निवडलेल्या ठिकाणावर आक्षेप

'ऑटोमोटिव्ह पार्ट्स मर्चंट असोसिएशन' (APMA) ने म्हटले होते की, रॅलीच्या ठिकाणामुळे तीन किलोमीटरच्या परिसरातील व्यावसायिक हालचालींवर परिणाम होऊ शकतो, तर APMA चे अध्यक्ष विनय नारंग यांनी स्पष्ट केले होते की, व्यापारी लोकशाही मार्गाने होणाऱ्या निदर्शनांच्या विरोधात नाहीत; परंतु त्यांना रॅलीच्या वेळेवर आणि निवडलेल्या ठिकाणावर आक्षेप आहे.

India Alliance Ramlila Maidan rally Delhi traders loss
INDIA Bloc Rally in Delhi : ज्ञानेश कुमारांना CEC पदावरून हटवले जाईल; मोदी-शहांविरोधात लढणार; राहुल गांधींचा निर्धार

राहुल गांधींनी केले होते खरेदीचे आवाहन

व्यापारी संघटनांनी व्यक्त केलेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रॅलीसाठी दिल्लीला येणाऱ्या लोकांना आवाहन केले की, सणासुदीच्या काळात स्थानिक व्यापाऱ्यांच्या दुकानांतून खरेदी करून त्यांना पाठिंबा द्यावा. त्यांनी शनिवारी 'एक्स' (X) वर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये म्हटलंत होतं की, “निदर्शने करा, मोर्चा काढा, रॅली आयोजित करा आणि त्यासोबतच थोडी खरेदीही करा—यामुळे व्यापाऱ्यांचा फायदा होईल.” तसेच भाजपने या रॅलीच्या संभाव्य आर्थिक परिणामांबाबत अफवा पसरवल्या आहेत, असा आरोपही त्यांनी केला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.