Delhi Jantar Mantar : दिल्ली-जयपूरच नाही, तर 'या' ५ शहरांमध्येही आहेत जंतर-मंतर; जाणून घ्या त्‍यांच्या निर्मितीमागचं रहस्य..

'नीट' पेपर लीक प्रकरणी कॉकरोज पार्टीने आक्रमक भूमिका घेत दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन सुरू केले आहे.
Delhi Jantar Mantar : दिल्ली-जयपूरच नाही, तर 'या' ५ शहरांमध्येही आहेत जंतर-मंतर; जाणून घ्या त्‍यांच्या निर्मितीमागचं रहस्य..
Published on
Updated on

india 5 jantar mantars only jaipur is unesco world heritage site

पुढारी ऑनलाईन : 'नीट' पेपर लीक प्रकरणी कॉकरोज पार्टीने आक्रमक भूमिका घेत दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन सुरू केले आहे. त्‍या पार्श्वभूमीवर देशात जंतर-मंतर हे सध्या चर्चेचे केंद्र बनले आहे. त्‍यामुळे जंतर-मंतर हे नेमके काय आहे त्‍याची निर्मिती कोणी केली आणि कोठे अशी जंतर-मंतर आहेत ते जाणून घेऊयात..

भारतात महाराजा सवाई जयसिंह द्वितीय यांनी एकूण पाच जंतर-मंतर बांधले होते. या वेधशाळांचा उपयोग ग्रह-नक्षत्रे आणि वेळेची अचूक गणना करण्यासाठी केला जात असे. यामध्ये जयपूर, दिल्ली, उज्जैन, वाराणसी आणि मथुरा यांचा समावेश आहे. मात्र, या पाचपैकी केवळ जयपूरच्या जंतर-मंतरला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला आहे.

Delhi Jantar Mantar : दिल्ली-जयपूरच नाही, तर 'या' ५ शहरांमध्येही आहेत जंतर-मंतर; जाणून घ्या त्‍यांच्या निर्मितीमागचं रहस्य..
Social Media : पोस्ट, कमेंट, लाईकवर बंदी? 16 वर्षांखालील मुलांसाठी 'या' सरकारचा मोठा प्लॅन

जर तुम्हाला वाटत असेल की जंतर-मंतर फक्त दिल्ली आणि जयपूरमध्येच आहे, तर ही माहिती पूर्णपणे बरोबर नाही. वास्तविक, भारतात दिल्ली, जयपूर, उज्जैन, वाराणसी आणि मथुरा या पाच ठिकाणी एकूण 5 जंतर-मंतर बांधण्यात आले होते. यांची निर्मिती 18व्या शतकात जयपूरचे महाराजा सवाई जयसिंह द्वितीय यांनी केले होते.

त्या काळात आधुनिक दुर्बिणी किंवा संगणक उपलब्ध नव्हते. त्यामुळे आकाशातील घडामोडींचा अभ्यास करण्यासाठी दगड आणि संगमरवरापासून बनवलेली मोठमोठी वैज्ञानिक उपकरणे तयार करण्यात आली. या उपकरणांच्या मदतीने सूर्य आणि चंद्राची स्थिती, ग्रह-नक्षत्रांची चाल, वेळ तसेच ग्रहणासारख्या खगोलीय घटनांचा अचूक अभ्यास केला जात असे.

जयपूरचा जंतर-मंतर सर्वात खास का?

भारतातील पाचही जंतर-मंतरपैकी जयपूरचा जंतर-मंतर सर्वात मोठा आणि उत्तम स्थितीत असलेला आहे. याच कारणामुळे 2010 मध्ये युनेस्कोने त्याला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला.

Delhi Jantar Mantar : दिल्ली-जयपूरच नाही, तर 'या' ५ शहरांमध्येही आहेत जंतर-मंतर; जाणून घ्या त्‍यांच्या निर्मितीमागचं रहस्य..
H-1B Visa Fee Row : भारतीय IT व्यावसायिकांना मोठा दिलासा! १ लाख डॉलरच्या व्हिसा शुल्काविरोधातील याचिका कोर्टाने फेटाळली

येथे सुमारे 19 विशाल खगोलीय उपकरणे आहेत. यामध्ये सम्राट यंत्र सर्वात प्रसिद्ध आहे. हे जगातील सर्वात मोठे दगडी सूर्यघड्याळ (सनडायल) मानले जाते. त्याच्या मदतीने अत्यंत अचूक वेळ जाणून घेता येते. आजही देश-विदेशातून लाखो पर्यटक हे ठिकाण पाहण्यासाठी येथे येतात.

दिल्लीचा जंतर-मंतर

दिल्लीचा जंतर-मंतर सर्वात आधी बांधण्यात आला होता. त्‍याची निर्मिती सुमारे 1721 मध्ये झाले. सुरुवातीला याचा उपयोग खगोलीय अभ्यासासाठी केला जात असे. मात्र, कालांतराने त्याची ओळख बदलत गेली.

आज हे ठिकाण ऐतिहासिक स्मारक असण्यासोबतच धरणे, निदर्शने आणि सामाजिक आंदोलनांसाठीही ओळखले जाते. असे असले तरी, येथे असलेली वैज्ञानिक उपकरणे त्या काळातील उत्कृष्ट वैज्ञानिक विचारांची आठवण करून देतात.

उज्जैनचा जंतर-मंतर

मध्य प्रदेशातील उज्जैन हे प्राचीन काळापासूनच खगोलशास्त्राचे एक महत्त्वाचे केंद्र मानले जाते. येथे बांधण्यात आलेल्या जंतर-मंतरचा उपयोग ग्रह आणि ताऱ्यांच्या हालचालींचा अभ्यास करण्यासाठी केला जात असे. त्या काळातील खगोलीय गणनांमध्ये या वेधशाळेची महत्त्वाची भूमिका होती.

वाराणसीचा जंतर-मंतर

उत्तर प्रदेशातील वाराणसी येथेही एक जंतर-मंतर बांधण्यात आले होते. आकाराने हे जयपूर आणि दिल्लीच्या जंतर-मंतरपेक्षा लहान आहे; मात्र त्याचा उद्देश तोच होता.

येथेही वेळेची गणना आणि आकाशातील खगोलीय पिंडांच्या स्थितीचा अभ्यास केला जात असे. आजही इतिहास आणि विज्ञानामध्ये रस असलेल्या लोकांना हे ठिकाण आकर्षित करते.

मथुरेचा जंतर-मंतर

भारतामधील पाचवा जंतर-मंतर मथुरा येथे बांधण्यात आला होता. मात्र, कालांतराने तो जवळपास पूर्णपणे नष्ट झाला. आज त्याचे फारच कमी अवशेष शिल्लक आहेत. त्यामुळे सध्या भारतात चार प्रमुख जंतर-मंतर पाहायला मिळतात.

जंतर-मंतर इतके खास का आहेत?

जंतर-मंतर हे केवळ जुने ऐतिहासिक स्मारक नाहीत, तर शेकडो वर्षांपूर्वी भारतातील विज्ञान आणि खगोलशास्त्र किती प्रगत होते, याचा पुरावाही आहेत.

आधुनिक यंत्रसामग्री आणि तंत्रज्ञान उपलब्ध नसतानाही त्या काळात अशी उपकरणे तयार करण्यात आली होती, ज्यांच्या मदतीने वेळ अचूकपणे सांगता येत असे आणि ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीचा अचूक अंदाज घेता येत असे.

याच कारणामुळे जंतर-मंतर आजही भारताची वैज्ञानिक परंपरा, अभियांत्रिकी कौशल्य आणि अप्रतिम वास्तुकलेचे अनमोल प्रतीक मानले जातात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news