Rohit Sharma Records : रोहित शर्माच्या निशाण्यावर 2 मोठे विक्रम! ‘अशी’ कामगिरी करणारा ठरेल पहिला खेळाडू

Rohit Sharma
Rohit Sharma
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Rohit Sharma Records : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना धर्मशाला येथील निसर्गसपन्न मैदानावर खेळला जाणार आहे. टीम इंडियाने मालिकेत आधीच 3-1 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. भारतीय संघासाठी गोलंदाज आणि फलंदाज चांगली कामगिरी करत आहेत. चौथ्या कसोटी सामन्यात भारताकडून यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल आणि ध्रुव जुरेल यांनी दमदार खेळी केली. युवा ब्रिगेडने टीम इंडियाला स्वबळावर विजय मिळवून दिला होता. असे असले तरी पाचव्या कसोटीत कर्णधार रोहित शर्मा दोन मोठे विक्रम करू शकतो.

भारतीय संघाचा सुपरस्टार फलंदाज रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत 594 षटकार ठोकले आहेत. धर्मशाला येथे होणाऱ्या कसोटी सामन्यात त्याने आणखी 6 षटकार मारले तर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 600 षटकार पूर्ण करेल. यासह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिला फलंदाज ठरणार आहे. ख्रिस गेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 553 षटकार ठोकले आहेत. (Rohit Sharma Records)

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारे फलंदाज

रोहित शर्मा : 594 षटकार
ख्रिस गेल : 553 षटकार
शाहिद आफ्रिदी : 476 षटकार
ब्रेंडन मॅक्युलम : 398 षटकार
मार्टिन गप्टिल : 383 षटकार

रोहित शर्मा नेहमीच स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याच्याकडे कोणत्याही गोलंदाजीचे आक्रमण उद्ध्वस्त करण्याची क्षमता आहे. त्याने टीम इंडियासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत. इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात रोहितने आणखी एक षटकार मारल्यास तो जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमधील षटकारांचे अर्धशतक पूर्ण करेल. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये 50 षटकार ठोकणारा तो बेन स्टोक्सनंतरचा दुसरा फलंदाज ठरेल. (Rohit Sharma Records)

WTCमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारे फलंदाज (Rohit Sharma Records)

बेन स्टोक्स : 78 षटकार
रोहित शर्मा : 49 षटकार
ऋषभ पंत : 38 षटकार
जॉनी बेअरस्टो : 27 षटकार
यशस्वी जैस्वाल : 26 षटकार

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news