पुढारी ऑनलाईन डेस्क: यंदाच्या लोकसभा निवडणुकीदरम्यान आयकर विभागाने (Income Tax Department) मोठी कामगिरी केली आहे. या दरम्यानच्या काळात विक्रमी ११०० कोटी रुपयांची रोकड आणि दागिने जप्त करण्यात आले आहेत. ही रक्कम सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपेक्षा १८२ टक्क्यांनी अधिक आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे.
आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, लोकसभेच्या पार्श्वभूमीवर गुरूवार ३० मे अखेरीस विभागाने अंदाजे ११०० कोटी रुपयांची रोकड आणि दागिने जप्त केले आहेत. जे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत जप्त करण्यात आलेल्या ३९० कोटी रुपयांच्या तुलनेत १८२ टक्क्यांनी वाढ (Income Tax Department) झाली आहे.
भारतीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्याच्या दिवशी 16 मार्च रोजी आदर्श आचारसंहिता (MCC) लागू झाली. तेव्हापासून, आयकर विभाग मतदारांवर संभाव्य प्रभाव टाकू शकणाऱ्या बेहिशेबी रोकड आणि मौल्यवान वस्तूंवर लक्ष ठेवून आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली आणि कर्नाटकमध्ये सर्वाधिक जप्तींच्या यादीत अव्वल स्थानावर आहेत, प्रत्येक राज्यात 200 कोटी रुपयांपेक्षा जास्त रोख आणि दागिने जप्त (Income Tax Department) करण्यात आले आहेत.