PM मोदींच्या हस्ते ७६ हजार कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण, वाढवण बंदराचे भूमिपूजन

PM Modi in Palghar | पालघरमध्ये २१८ मत्स्यपालन प्रकल्पांचेही उद्धाटन
PM Narendra Modi
PM मोदींच्या हस्ते ७६ हजार कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण, वाढवण बंदराची पायाभरणीANI X
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क: पालघरमध्ये आज (दि.३० ऑगस्ट) सुमारे ७६ हजार कोटी रूपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या (PM Modi in Palghar) हस्ते झाले. यामध्ये वाढवण बंदर प्रकल्पाची (Vadhavan Port) पंतप्रधान मोदींच्या हस्ते पायाभरणी आणि भूमिपूजन करण्यात आले. तसेच सुमारे १ हजार ५६० कोटी रूपयांच्या २१८ मत्स्यपालन प्रकल्पांचेही उद्धाटन आणि पायाभरणी करण्यात आली.

यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल हे देखील उपस्थित होते.

जगातील दहा महाकाय बंदरामध्ये समाविष्ट होणाऱ्या व तब्बल 77 हजार कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येणाऱ्या हरित वाढवण बंदराचे आज (शुक्रवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी भूमिपूजन करणार आहेत. हे भूमिपूजन कोळगाव सिडको मैदान येथून दुपारी एक ते दीड वाजता मोदींच्या हस्ते केले जाणार आहे. वाढवण बंदराच्या भूमिपूजनासह 1563 कोटी रुपयांच्या मत्स्य विकासाच्या योजनांचे उद्घाटन व घोषणाही पंतप्रधान मोदी करणार आहेत.हरित बंदर प्रकल्प

वाढवण बंदराच्या उभारणीसाठी वाढवण पोर्ट प्रोजेक्ट मर्यादित कंपनी स्थापन करण्यात आली आहे. वाढवण बंदर समुद्रामध्ये 1448 हेक्टर क्षेत्रावर भराव करून करण्यात येणार आहे. हा भराव दमण येथील समुद्री वाळूने केला जाणार आहे. या बंदराचे काम करताना पर्यावरणीय समतोल राखला जाणार असून समुद्री जैवविविधता टिकण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. बंदर उभारताना किमान प्रदूषणाची संकल्पना असल्याने या प्रकल्पाला हरित बंदर प्रकल्प म्हटले जात आहे.

Vadhavan Port News : आत्मनिर्भर भारत करण्यामध्ये 'या' बंदराचा मोठा वाटा

बंदराची कंटेनर हाताळणी क्षमता 300 मिलियन मॅट्रिक टन इतकी असणार आहे. बंदर उभारणी झाल्यानंतर येथील जलवाहतूक आंतरराष्ट्रीय स्तरावर जोडली जाईल. त्यामुळे भारत सागरी जलवाहतुकीच्या क्षेत्रामध्ये आणखीन यशस्वी ठरणार आहे, असा दावा सरकारचा आहे. वाढवण बंदर प्रकल्प उभारताना प्रकल्पाच्या परिघात शैक्षणिक,आरोग्य,रोजगार, तांत्रिक, सागरी मंडळ प्रशिक्षण केंद्र, तंत्रज्ञान केंद्र व इतर सुविधांनी युक्त असलेल्या विविध संस्था उभारण्यात येणार आहेत.

प्रस्तावित वाढवण बंदर उभे राहिल्यास आत्मनिर्भर भारत करण्यामध्ये या बंदराचा मोठा वाटा असणार आहे. तसेच या बंदराद्वारे भारताला मोठे परकीय चलन प्राप्त होणार असल्याने हे बंदर भारतीय अर्थव्यवस्थेसाठी चालना देणारे ठरणार आहे. यासह या बंदरामुळे पश्चिम भागातील जलवाहतूक सुरळीत सुरू राहील व या बंदरामुळे पुढील काही वर्ष इतर बंदर उभारनीची गरज राहणार नाही.

हिला टप्पा 2028 पर्यंत पूर्ण होणार

सर्वाधिक कंटेनर हाताळणी बंदर अशी वाढवण बंदराची ओळख असेल. 20.2 मीटर नैसर्गिक खोली असल्यामुळे येथे जहाजांची हाताळणी अधिक सोपी होणार आहे 23.2 मेट्रिक टी ई यु कंटेनर हाताळणी क्षमता बंदराची आहे.बंदर टप्प्याटप्प्याने कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे, पहिला टप्पा 2028 पर्यंत पूर्ण होणार आहे. (Vadhavan Port)

देशभरातील या क्षेत्राच्या पायाभूत सुविधा आणि उत्पादकता वाढवण्याच्या उद्देशाने 214 मत्स्यव्यवसाय प्रकल्पाचे उद्घाट पंतप्रधान करणार आहेत. 416.8 कोटी रुपयांच्या भरीव गुंतवणुकीसह या उपक्रमांमध्ये फिशिंग हार्बर्स आणि इंटिग्रेटेड ॲक्वापार्कच्या विकासासह री-सर्क्युलेटरी ॲक्वाकल्चर सिस्टम (RAS) आणि बायोफ्लोक यासारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आदी योजनांचा या कामात समावेश आहे. हे प्रकल्प आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, महाराष्ट्र आणि इतर राज्यांसह अनेक राज्यांमध्ये लागू केले जाणार आहेत. मत्स्य उत्पादन वाढविण्यासह त्याशी संबंधित व्यवस्थापन सुधारण्यासाठी आणि मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील लाखो लोकांसाठी शाश्वत उपजीविका निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा आणि उच्च दर्जाचे उत्पादन या योजनांच्या अंमलबजावणीनंतर होणार आहे.

जहाजांवर ट्रान्सपॉन्डर्स

पंतप्रधान मोदी एकूण 757.27 कोटी खर्चाच्या महत्त्वाच्या मत्स्यपालन पायाभूत सुविधा प्रकल्पांची पायाभरणी या कार्यक्रमात झाली. यामध्ये मासेमारी बंदरांचा विकास, सुधारणा आणि आधुनिकीकरण, फिश लँडिंग सेंटर आणि मासळी बाजाराचे बांधकाम अशा योजनांचा समावेश आहे.

समुद्रातील मच्छिमारांची सुरक्षितता आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि संकटाच्या वेळी त्यांना संवाद साधण्यास सक्षम करण्यासाठी इस्रोने स्वदेशी तंत्रज्ञान वापरून विकसित केलेल्या 364 कोटी खर्चासह 1 लाख मासेमारी जहाजांवर ट्रान्सपॉन्डर्स बसवण्याची योजनाही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटीत केली जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news