Arvind Kejriwal | ‘जनता आनंदी तर तुरुंगात मी सुखी’; आत्मसमर्पणापूर्वी केजरीवालांची भावनिक पोस्ट

Arvind Kejriwal:
Arvind Kejriwal:

पुढारी ऑनलाईन डेस्क: दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांचा आज (दि.२ जून) अंतरिम जामीन संपत आहे. सर्वोच्च न्यायालयाने लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या प्रचारासाठी केजरीवलांना २१ दिवसांचा जामीन मंजूर केला होता. केजरीवलांचा जामीन शनिवारी (दि.१ जून) संपल्यानंतर ते आज (दि.२ जून) दुपारनंतर तिहार तुरुंगात आत्मसमर्पण करणार (Arvind Kejriwal) असून, तत्पूर्वी त्यांनी X पोस्ट केली आहे.

Arvind Kejriwal: केजरीवालांनी सुप्रीम कोर्टाचे मानले आभार

अरविंद केजरीवाल यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मी 21 दिवस निवडणूक प्रचारासाठी बाहेर पडलो. माननीय सर्वोच्च न्यायालयाचे खूप खूप आभार (Arvind Kejriwal)'.

दुपारी ३ वाजता केजरीवाल घरातून बाहेर पडणार

आज मी तिहार तुरुंगात जाऊन शरण जाईन. मी दुपारी ३ वाजता घरून निघेन. सर्वप्रथम मी राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना आदरांजली वाहणार आहे. तेथून मी हनुमानजींचा आशीर्वाद घेण्यासाठी कॅनॉट प्लेस येथील हनुमान मंदिरात जाईन. आणि तेथून मी पक्ष कार्यालयात जाऊन सर्व कार्यकर्त्यांची आणि पक्षाच्या नेत्यांची भेट घेणार आहे. तेथून मी पुन्हा तिहार तुरुंगात जाईन, असेही मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी म्हटले आहे.

'तुम्ही आनंदी तर तुरुंगात केजरीवाल सुखी'

'तुम्ही सर्वांनी स्वतःची काळजी घ्या. तुरुंगात तुम्हा सर्वांची मला काळजी वाटेल. तुम्ही आनंदी असाल तर तुमचे केजरीवाल तुरुंगातही सुखी होतील', अशी कार्यकर्ते आणि चाहत्यांना भावनिक साद दिली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news