

Trump vs Modi popularity:
नवी दिल्ली : अमेरिकेच राष्ट्राध्याक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे लोकप्रिय नाहीत, त्यामुळे त्यांनी घेतलेले निर्णय नवे राष्ट्राध्यक्ष बदलू शकतात, असे खळबळजनक विधान प्रसिद्ध भू-राजकीय तज्ञ इयान ब्रेमर यांनी केले आहे.
अमेरिकेच्या कारवाईत व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना अटक झाल्याने आंतरराष्ट्रीय राजकारणात एक नवीन वादविवाद सुरू झाला आहे. हा अमेरिकेसाठी एक मोठा धोरणात्मक विजय मानला जात आहे, परंतु प्रसिद्ध भू-राजकीय तज्ञ इयान ब्रेमर दीर्घकालीन फायद्यांबाबत साशंक आहेत. ब्रेमर म्हणाले की, व्हाईट हाऊसला सध्या राजकीय फायदा दिसत असला तरी, ट्रम्प यांची सत्ता गेल्यानंतर परिस्थिती पूर्णपणे बदलू शकते.
इंडिया टुडेला दिलेल्या विशेष मुलाखतीत ब्रेमर यांनी म्हटले की, ज्याप्रमाणे ट्रम्प यांनी आपल्या पूर्ववर्तींच्या कामांना रद्दबातल केले, त्याचप्रमाणे ट्रम्प यांचे उत्तराधिकारीही त्यांनी केलेल्या बऱ्याच गोष्टी रद्द करू शकतात. चीन, रशिया आणि भारताच्या तुलनेत, ब्रेमर यांनी सांगितले की, अमेरिकेत दर चार वर्षांनी नेतृत्वात होणाऱ्या नियमित बदलांमुळे सरकारी धोरणांमध्ये सातत्य राहत नाही, ज्यामुळे त्याचे परिणाम मिळण्यास वेळ लागतो.
ब्रेमर पुढे म्हणाले की, पुढचा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केलेल्या बऱ्याच गोष्टी रद्द करू शकतो. ते पंतप्रधान मोदींसारखे नाहीत, मोदी १० वर्षांहून अधिक काळ देशाचे नेतृत्व करत आहेत. एका लोकशाही देशात त्यांची लोकप्रियता खूप जास्त आहे. मात्र ट्रम्प अलोकप्रिय असून ३ वर्षांत सत्तेतून बाहेर पडतील.