High Court: घरातील रोबोट व्हॅक्यूमने उघड केले पत्नीचे अनैतिक संबंध; केस जिंकूनही एका चुकीने पतीलाच जावे लागले तुरुंगात!

एका पतीने आपल्या पत्नीच्या अनैतिक संबंध उघडकीस आणण्यासाठी घरातील 'रोबोट व्हॅक्यूम क्लीनर'चा कॅमेरा व स्पीकर वापरला. पत्नीचे प्रियकरासोबत खासगी व्हिडिओ बनवले. मात्र शेवटी न्यायालयाने पतीला ५ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.
Robot vacuum cheating wife taiwan case
Robot vacuum cheating wife taiwan caseAI Photo
Published on
Updated on

Husband records wife affair

नवी दिल्ली: तंत्रज्ञान आता मानवी आयुष्यातील अत्यंत वैयक्तिक आणि नाजूक प्रकरणांपर्यंत कसे पोहोचू शकते, याचे एक अजब उदाहरण तैवानमध्ये समोर आले आहे. एका पतीने आपल्या पत्नीच्या अनैतिक संबंध उघडकीस आणण्यासाठी घरातील 'रोबोट व्हॅक्यूम क्लीनर'चा कॅमेरा व स्पीकर वापरला. या पुराव्यांच्या आधारे त्याने न्यायालयात पत्नीकडून १५ लाख रुपयांची भरपाई मिळवली, परंतु नंतर एका चुकीने पतीलाच थेट तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.

नेमकं काय आहे प्रकरण?

तैवानमधील एका दांपत्याचे २०२१ मध्ये लग्न झाले होते. हे दोघे सण-उत्सवाच्या वेळी आपल्या फार्महाउसमध्ये राहायला जात असत. सप्टेंबर २०२३ मध्ये पतीला या घरात एक वापरलेला टूथब्रश सापडला. हा टूथब्रश दुसऱ्याच कोणाचा तरी असल्याचा संशय आल्याने त्याने चोरून तपास सुरू केला. 'साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट'च्या वृत्तानुसार, पतीने जवळच्या पार्किंग गॅरेजचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात एक अनोळखी व्यक्ती त्याच्या पत्नीला सोडायला आल्याचे दिसले. यामुळे त्याचा संशय बळकावला, पण कायदेशीर कारवाईसाठी ठोस पुराव्याची गरज होती.

Robot vacuum cheating wife taiwan case
Mocking Wife a High Court : पत्नीला रंगावरून, हुशारीवरून टोमणे मारणे क्रूरता नाही... उच्च न्यायालयाचा आगळा वेगळा निर्णय

रोबोट व्हॅक्यूमने पत्नीचे व्हिडिओ बनवले

डिसेंबर २०२३ मध्ये पतीने मोबाईल ॲपद्वारे घरातील रोबोट व्हॅक्यूम क्लीनर सुरू केला. या उपकरणात थेट व्हिडिओ आणि ऑडिओ लाईव्ह पाहण्याची सुविधा होती. त्याने ॲप चालू करताच त्याला पत्नी दुसऱ्या एका पुरुषासोबत आक्षेपार्ह स्थितीत दिसून आली. पतीने लगेचच त्या उपकरणाद्वारे मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग सुरू केले.

पत्नी आणि तिच्या प्रियकराकडून १५ लाखांची भरपाई

पतीने हे चित्रीकरण पुरावा म्हणून न्यायालयात सादर करत पत्नी आणि तिच्या प्रियकराविरुद्ध ६० लाख रुपयांची नुकसानभरपाईचा दावा केला. न्यायालयाने पुरावे ग्राह्य धरून हे नाते सामान्य मैत्रीच्या पलीकडचे असल्याचे स्पष्ट केले आणि पत्नी व तिच्या प्रियकराला १५ लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले.

पत्नीकडून पतीविरोधातच फौजदारी गुन्हा दाखल

यानंतर पत्नीने आपल्या गोपनीयतेच्या हक्काचा भंग झाल्याचे सांगत पतीविरोधातच फौजदारी गुन्हा दाखल केला. पतीने न्यायालयात बचाव करताना सांगितले की, रोबोट व्हॅक्यूम चालू झाल्यावर त्यात लाईट्स लागतात आणि आवाज येतो, त्यामुळे पत्नीला रेकॉर्डिंग होत असल्याचे माहीत असावे. शिवाय, हे रेकॉर्डिंग कोर्टाने पुरावा म्हणून स्वीकारले आहे, त्यामुळे माझी कृती कायदेशीरदृष्ट्या योग्य होती, असा दावा त्याने केला.

पतीला ५ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा

मात्र, फौजदारी न्यायालयाने पतीचा हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला. "वैवाहिक कर्तव्ये किंवा संशय हा कोणत्याही व्यक्तीच्या गोपनीयतेच्या मूलभूत हक्कापेक्षा मोठा असू शकत नाही," असे स्पष्ट करत न्यायालयाने पतीला परवानगी शिवाय वैयक्तिक व्हिडिओ केल्याप्रकरणी दोषी ठरवले. न्यायालयाने पतीला ५ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली, तसेच साडेचार लाख रुपयांचा दंडही ठोठावला. संशयाच्या भरात उपकरणाचा छुप्या पद्धतीने वापर करणे पतीला शेवटी भलतेच महागात पडले.

Robot vacuum cheating wife taiwan case
High Court Hijab Verdict: शाळेत हिजाब घालायला परवानगी द्या; विद्यार्थिनीने केली याचिका, हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news