

hunter marut fighter plane placed on the india pakistan border
जैसलमेर : पुढारी ऑनलाईन
'ऑपरेशन सिंदूर' नंतर जैसलमेर (राजस्थान) मधील लोकं त्या ऐतिकासिक हंटर लढाउ विमानाची आठवण काढत आहेत. ज्या विमानाने १९७१ सालच्या भारत-पाकिस्तान युद्धात लोंगेवालाच्या युद्धात पाकिस्तानची झोप उडवली होती. या विमाभाने फक्त दोन तासात पाकिस्तानचे ५२ टँक आणि पूर्ण ब्रिगेडला नष्ट करून युद्धाचा चेहराच बदलून टाकला होता.
मेजर कुलदीप सिंह चांदपुरी यांच्या नेतृत्वाखाली १२० सैनिकांनी लोंगेवालामध्ये मोर्चा सांभाळला होता. तर विंग कमांडर एमएस बाबा यांनी हंटर विमानातून बॉम्बवर्षाव करून पाकिस्तानी सैन्याचे स्मशानात रूपांतरीत केले होते. आजही हे विमान गर्वाचे प्रतिकाच्या स्वरूपात दिमाखात उभे आहे. जे पाकिस्तानला भारताची ताकद दाखवते.
भारत-पाक सीमेवरील तणावादरम्यान पाकिस्तानकडून सलग १४ व्या दिवशी नियंत्रण रेषेवर गोळीबार सुरूच आहे. मात्र अशा युद्ध प्रसंगी घाबरण्यापेक्षा सीमेवरील लोक लढण्यासाठी तयार आहेत. माजी सैनिकांनी १९७१ प्रमाणे लढण्यासाठी शस्त्रांच्या परवान्यांची मागणी केली आहे. ज्यामुळे त्यांना आत्मसंरक्षण आणि देशाच्या सुरक्षेसाठी योगदान देता येईल. स्थानिक लोक आणि प्रशासन आपत्कालिन परिस्थितीत लढण्यासाठी एकत्र काम करत आहेत.
सीमेवर राहणाऱ्या लोकांचे म्हणणे आहे की, पाकिस्तानच्या प्रत्येक आगळीकीला उत्तर देण्यासाठी आम्ही तयार आहोत. एका माजी सैनिकाने सांगितले की, १९७१ मध्ये हंटरने जो इतिहास लिहिला, जो अजुनही आमच्या रक्तात आहे. गरज पडली तर आम्ही तो गौरवशाली इतिहास पुन्हा नव्याने लिहू. जैसरमेरच्या हंटर विमानाला पाहण्यासाठी लोक गर्दी करत आहेत. हे विमान त्यांच्यासाठी प्रेरणेचा स्त्रोत आहे.
भारत-पाकिस्तान या दोन देशांमधील सध्याची तणावाची परिस्थिती पाहता सीमेवरील जिल्हे ज्यामध्ये फिरोजपूर, पठाणकोट, फाजिल्का, अमृतसर, गुरूदासपूर आणि तरनतारणमध्ये ८ मे पर्यंत शाळा बंद ठेवल्या आहेत. तसेच प्रशासनाने ब्लॅकआउट लागू केला आहे. लोकांना रात्री लाईट बंद ठेवण्यास सांगितले आहे.
'ऑपरेशन सिंदूर' मध्ये भारतीय सैन्य, वायुसेना आणि नौसेनेने मिळुन बहावलपूर, मुरीदके आणि मुजफ्फराबादमध्ये दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य केले आहे. गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या हल्ल्यात जवळपास ९० दहशतवादी ठार झाले आहेत.
पाकिस्तानने भारताला प्रतिहल्ला करण्याची धमकी दिली आहे. सीमेवर गोळीबार आणि गुरूव्दारेमध्ये हल्ला यासारख्या कृत्याने तणाव आणखी वाढला आहे. मात्र भारताने हे स्पष्ट केले आहे की, दहशतवादाबाबत 'झिरो टॉलरन्स' निती कायम ठेवणार आहे.