कोलकातामधील मॉलमध्ये भीषण आग

प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : कोलकाता शहरातील एक्रोपोलिस मॉलमध्ये आज ( दि. १४ जून) दुपारी भीषण आग लागली. अग्निशमन विभागाकडून आग विझवण्यासाठी दहा बंब रवाना करण्यात आले आहेत. आग लागल्यानंतर लोक मॉलमधून बाहेर पडत असल्याचे व्हिडिओ  व्‍हायरल झाले आहेत.

ॲक्रोपोलिस मॉलच्या पाचव्या मजल्यावर असलेल्या फूड कोर्टला शुक्रवारी दुपारी भीषण आग लागली. कोणतीही जीवितहानी झाली नाही. मॉलमध्‍ये अडकलेल्‍यांना बाहेर काढण्‍याचे काम युद्‍धपातळीवर सुरु आहे. अग्निशमन कार्य सुरू आहे. कर्मचारी अग्निशमन ऑक्सिजन मास्क घालून इमारतीत दाखल झाले आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news