PM Svanidhi Scheme: सरकार देत आहे ९० हजार रूपयांचे बिना तारण कर्ज; जाणून घ्या कसा करायचा अर्ज

जर तुम्ही लघु उद्योग सुरू करण्यासाठी उत्सुक असाल अन् तुम्हाला पैशाच्या कमतरतेमुळं अडचणी येत असतील तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
PM Svanidhi Scheme
PM Svanidhi Schemepudhari photo
Published on
Updated on

PM Svanidhi Scheme how to apply:

जर तुम्ही लघु उद्योग सुरू करण्यासाठी उत्सुक असाल अन् तुम्हाला पैशाच्या कमतरतेमुळं अडचणी येत असतील तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सरकारने एक खास योजना सुरू केली आहे. सरकार ९० हजार रूपयांपर्यंतचं बिझनेस लोन देत आहे. यासाठी तुम्हाला काहीही तारण ठेवण्याची गरज नाहीये. त्याचबरोबर हे कर्ज मिळवण्यासाठी तुम्हाला फार कागदी घोडे देखील नाचवण्याची गरज नाहीये. फक्त एका कागदपत्राच्या आधारावर तुम्हाला हे कर्ज मिळणार आहे. याचे पैसे थेट तुमच्या खात्यात जमा होतील. ही स्कीम आहे पीएम स्वनिधी योजना (PM Svanidhi Scheme)

PM Svanidhi Scheme
Schemes for Brahmin: राज्यातील ब्राह्मण, आर्य वैश्य, राजपूत समाजाच्या तरुणांसाठी योजना, दरवर्षी किती जणांना मिळणार लाभ?

कधीपासून सुरू झाली आहे ही स्कीम?

ज्यावेळी देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला होता. त्यावेळी सर्वात जास्त नुकसान हे लघु उद्योग आणि फेरीवाल्यांचं झालं होतं. त्यांना त्यांचा व्यवसाय सुस्थितीत आणण्यासाठी मोदी सरकारनं पीएम स्वनिधी योजना सुरू केली होती. या योजनेमध्ये प्रभावित झालेला आपला लघु उद्योग पुन्हा उभारण्यासाठी आर्थिक मदत केली जाते. यापूर्वी या योजनेअंतर्गत ८० हजार रूपयांचे कर्ज दिले जात होते. मात्र २०२५ पासून या कर्जाच्या रक्कमेत वाढ करण्यात आली आहे. आता या योजनेअंतर्गत तुम्हाला ९० हजार रूपयांपर्यंतच कर्ज मिळू शकतं.

योजनेत काय बदल झालेत?

पीएम स्वनिधी योजनेच्या फक्त कर्ज रक्कमेत वाढ झालेली नाही तर सरकार हे कर्ज बिना तारण देतं. या स्कीमअंतर्गत सरकार निधी तीन टप्प्यात देतं. सरकारनं या स्कीममधील लिमीट देखील वाढवलं आहे. ऑगस्ट महिन्यात केंद्रीय कॅबिनेट बैठकीत पीएम स्वनिधी योजनेच्या विस्ताराला मंजूरी देण्यात आली आहे. ही स्कीम आता ३१ मार्च २०३० पर्यंत सुरू राहणार आहे.

PM Svanidhi Scheme
Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना... फक्त व्याजातून कमवू शकता 2 लाख रुपये; शून्य रिस्क, दमदार रिटर्न

कसं मिळतं ९० हजाराचं कर्ज?

पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत कर्ज तीन टप्प्यात देण्यात येतं. लघु उद्योग सुरू करण्यासाठी पहिला टप्पा हा १५ हजार रूपये दिला जातो. तर दुसऱ्या टप्प्यात २५ हजार रूपये दिले जातात. तिसऱ्या टप्प्यात ५० हजार रूपयांची रक्कम तुमच्या खात्यात जमा होते. सरकार ही रक्कम तुमच्या क्रेडिबिलिटीच्या आधारावर देते.

लघु उद्योग सुरू करण्यासाठी तुम्ही या कर्जासाठी अर्ज केला. तो मान्य झाला की बिना तारण तुम्हाला १५ हजाराचा पहिला हप्ता मिळतो. हे कर्ज ठरलेल्या वेळेत परत करायचं असतं. हे कर्ज ठरलेल्या वेळेत परत केल्यानंतर दुसरा हप्ता हा व्यवसाय वाढवण्यासाठी देण्यात येतो. हा हप्ता २५ हजार रूपयांचा असतो. ही रक्कम देखील ठरलेल्या वेळेत फेडावी लागते. जर असं केलं तर तुम्ही ५० हजार रूपये कर्ज मिळवण्यास पात्र होता.

कोणती कागदपत्रे आहेत महत्वाची?

९० हजाराचं हे कर्ज मिळवण्यासाठी तुम्हाला फार कागदपत्रांची गरज नाही. तुम्हाला फक्त एकाच कागदपत्राची गरज आहे ते म्हणजे तुमचं आधार कार्ड (Aadhaar Card). आधार कार्डशिवाय तुम्हाला इतर कोणत्याही कागदपत्राची गरज नाहीये. तुम्हाला फक्त मिळालेल्या कर्जाची ठरलेल्या वेळेत परतफेड करायची आहे. यासाठी तुम्हाला EMI Payment ची देखील सुविधा देण्यात आली आहे.

असा करा अर्ज

  • पीएम स्वनिधी योजनेचा फॉर्म घेऊन योग्य अन् अचूक माहिती भरा.

  • त्याला आधार कार्डची कॉपी जोडा.

  • भरलेला अर्ज बँकेद्वारे तपासला जातो. त्यानंतर कर्ज मंजूर केलं जातं.

  • कर्ज मंजूर झाल्यावर तीन टप्प्यात कर्ज रक्कम मिळण्यास सुरूवात होते.

PM Svanidhi Scheme
Mahadbt Tractor Scheme: पुरंदरमध्ये 3 हजार शेतकऱ्यांना ट्रॅक्टर लाभ; महाडीबीटीने दिली मोठी दिलासादायक मदत

पीएम स्वनिधी योजनेबाबतचे सरकारी आकडे पाहिले तर गेल्या ३० जुलै २०२५ पर्यंत Pm Svanidhi Scheme द्वारे ६८ लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांना १३ हजार ७९७ कोटी रूपयांचे ९७ लाखापेक्षा जास्त कर्ज वितरित करण्यात आले आहेत. या योजनेतील ४७ लाख लाभार्थी हे डिजीटली सक्रीय आहेत. या योजनेमुळं सरकारी तिजोरीवर ७ हाजर ३३२ कोटी रूपयांचा अतिरिक्त भार पडणार असल्याचा अंदाज आहे. यामुळे १.१५ कोटी फेरीवाल्यांना याचा फायदा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news