Lok Sabha Election Results 2024 : राहुल गांधींच्‍या ‘भारत जोडो’मुळे काँग्रेसच्‍या किती जागा वाढल्‍या?, जाणून घ्‍या सविस्‍तर

काँग्रेस पक्षाच्‍या वतीने ऑक्‍टोबर २०२२ ते जानेवारी २०२३ या काळात उत्तर-दक्षिण भारत जोडो पदयात्रा आयोजन करण्‍यात आले होते. या यात्रेनिमित्त राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर असा प्रवास केला.
काँग्रेस पक्षाच्‍या वतीने ऑक्‍टोबर २०२२ ते जानेवारी २०२३ या काळात उत्तर-दक्षिण भारत जोडो पदयात्रा आयोजन करण्‍यात आले होते. या यात्रेनिमित्त राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर असा प्रवास केला.

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : नुकताच लोकसभा निवडणूक निकाल जाहीर झाला. भाजप प्रणित 'एनडीए'ला बहुमत मिळाले. मात्र भाजपसाठी '४०० पार' ही घोषणा दिवास्‍वप्‍नच राहिली. पक्षाला केवळ २४० जागांवर समाधान मानावे लागलं. या निवडणुकीत काँग्रेसने तब्‍बल १० वर्षांनंतर दमदार पुनरागमन केले. ही निवडणूक काँग्रेसच्‍या अस्‍तित्‍वाची लढाई होती. पक्षानेही त्‍याच उद्देशाने ती लढली आणि ९९ जागांवर आपलं वर्चस्‍व सिद्‍ध केलं. ( Lok Sabha Election Results 2024) लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी दोन टप्‍प्‍यांमध्‍ये काढलेली देशव्‍यापी भारत जोडाे यात्रा बहुचर्चित ठरली. जाणून घेवूया राहुल गांधी यांच्‍या भारत जोडाे यात्रेचा लोकसभा निवडणूक निकालावर झालेल्‍या परिणामाविषयी….

काँग्रेस पक्षाच्‍या वतीने ऑक्‍टोबर २०२२ ते जानेवारी २०२३ या काळात उत्तर-दक्षिण भारत जोडो पदयात्रा आयोजन करण्‍यात आले होते. या यात्रेनिमित्त राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर असा प्रवास केला. यात्रेला ७ सप्‍टेंबर २०२२ रोजी कन्याकुमारी येथून प्रारंभ झाला. देशात एकता, सौहार्द आणि शांतीचा संदेश देणे हा या पदयात्रेचा मुख्‍य उद्देश होता. राहुल गांधी यांनी यात्रेदरम्यान विविध राज्ये आणि शहरांमध्ये लोकांच्या भेटी घेतल्या. या यात्रेचे दुसरे पर्व 'भारत जोडो न्याय यात्रा' ही लोकसभा निवडणुकीपूर्वी जानेवारी ते मार्च दरम्यान पार पडली होती.

२०१९ निवडणुकीच्‍या तुलनेत काँग्रेसला लक्षणीय यश

'इंडियन एक्‍सप्रेस'च्‍या रिपोर्टनुसार, राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ७१ लोकसभा मतदारसंघांमधून पार पडली. त्‍यापैकी ५६ लोकसभा मतदारसंघांमध्‍ये काँग्रेसने निवडणूक लढवली. यातील २३ ठिकाणी निवडणूक जिंकली आहे. त्या तुलनेत २०१९ लोकसभा निवडणुकीत याच ६५ मतदारसंघांपैकी काँग्रेसला केवळ १५ जागांवर विजय मिळाला होता. इंडिया आघाडीने या निवडणुकीत राहुल गांधी यांनी पदयात्रा केलेल्‍या ७१ पैकी १४ जागांवर निवडणूक लढवली हाेती. यापैकी ६ जागांवर विजय मिळवला आहे.

लाेकसभा निवडणुकीपूर्वी काढण्‍यात आलेल्‍या राहुल गांधी यांच्‍या भारत जोडो न्याय यात्रेत एकूण ८२ लोकसभा मतदारसंघांचा समावेश होता. त्यापैकी ४९ मतदारसंघांमध्‍ये काँग्रेसने निवडणूक लढवली. यापैकी १७ मतदारसंघांमध्‍ये विजय मिळवला आहे. मागील म्‍हणजे २०१९ लोकसभा निवडणुकीचा विचार करता काँग्रेसने याच ७१ लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवली होती आणि केवळ ६ जागांवर विजय मिळवला होता. इंडिया आघाडीचा विचार करता यंदा राहुल गांधी यांनी पदपात्रा काढलेल्‍या ८२ लाेकसभा मतदारसंघांपैकी ३३ जागांवर मित्रपक्षांनी निवडणूक लढवली. यातील १८ जागा जिंकल्या आहेत. तर २०१९ मध्ये काँग्रेस मित्रपक्षांनी याच १० लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवली होती;पण केवळ एका मतदारसंघात विजय झाला होता. या आकडेवारीवरुन राहुल गांधी यांच्‍या भारत जाेडाे यात्रेचा लाेकसभा निवडणुकीवर पडलेला प्रभाव स्‍पष्‍ट हाेताे.

भारत जोडो यात्रेचा राज्‍यनिहाय परिणाम

महाराष्‍ट्र : राहुल गांधी यांच्‍या भारत जोडो यात्रेचा महाराष्‍ट्रात काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी फायदा मिळविल्‍याचे दिसते. यात्रेच्‍या पहिल्‍या पर्वात महाराष्‍ट्रातील सहा लोकसभा मतदारसंघांचा समावेश होता. यापैकी चार जागा इंडिया आघाडीने जिंकल्‍या आहेत तर यात्रेच्‍या दुसर्‍या पर्वात आठ जागांपैकी इंडिया आघाडीने पाच जागा जिंकल्या आहेत.

हरियाणा : भारत जोडो यात्रेने राज्‍यातील पाच लोकसभा मतदारसंघातून प्रवास केला. यापैकी एक मतदारसंघात विजय झाला आहे. जागा जिंकली.

जम्मू-काश्मीर : भारत जोडो यात्रेने चार मतदारसंघातून प्रवास केला. यातील दोन जागा इंडिया आघाडीने जिंकल्‍या आहेत.

कर्नाटक : राज्‍यातील सात लोकसभा मतदारसंघांपैकी तीन मतदारसंघांमध्‍ये काँग्रेसचे उमेदवार जिंकले आहेत.
केरळ : राज्‍यात  ११ मतदारसंघातून भारत जाेडाे यात्रेने प्रवास केला. येथे काँग्रेसने 7 आणि त्यांच्या मित्रपक्षांनी दोन जिंकल्‍या आहेत.
पंजाब : राज्‍यातील सहा मतदारसंघातून भारत जोडो यात्रा काढण्‍यात आली. त्यापैकी पाच ठिकाणी विजय झाला. काँग्रेस आणि आप इंडिया आघाडीचा भाग होते. ते दिल्लीत एकत्र लढले असले तरी पंजाबमध्ये दोघे स्वतंत्रपणे लढले हाेते.
राजस्‍थान : भारत जोडो यात्रेने पाच मतदारसंघातून प्रवास केला. यातील ३ मतदारसंघात इंडिया आघाडीचा विजय झाला आहे.
तामिळनाडू : दोन मतदारसंघांपैकी एक काँग्रेसने तर दुसरी त्याच्या मित्रपक्ष द्रमुकने विजय मिळवला आहे.
उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशमधील २० मतदारसंघांतून राहुल गांधी यांनी प्रवास केला. यातील ३ मतदारसंघांमध्‍ये  काँग्रेस तर ५ मतदारसंघांत समाजवादी पार्टीला यश मिळाले आहे.
बिहार : बिहारमधील सात मतदारसंघांपैकी काँग्रेसने तीन जागा जिंकल्या आणि त्यांच्या मित्रपक्षांनी दोन जागा जिंकल्या.
पश्चिम बंगाल: भारत जोडो न्याय यात्रेने नऊ मतदारसंघात प्रवास केला. तृणमूलने पाच आणि काँग्रेसने एक जागा जिंकली आहे.
आसाम : भारत जोडो न्याय यात्रेने सहा लोकसभा मतदारसंघात प्रवास केला. येथे काँग्रेसने तीन जागा जिंकल्या आहेत.
झारखंड : सात लोकसभा मतदारसंघांमधून प्रवास यापैकी काँग्रेसने एक जागा जिंकली आणि त्यांच्या मित्रपक्षांनी एक जागा जिंकली.

भारत जोडो न्याय यात्रेने मेघालय, अरुणाचल प्रदेश, मणिपूर आणि नागालँडमधील ५ मतदारसंघात प्रवास केले. येथे काँग्रेसने तीन जागा जिंकल्‍या आहेत.

'या' राज्‍यामंध्‍ये 'भारत जोडो' प्रभाव पडला नाही

आंध्र प्रदेशमध्‍ये भारत जोडाे यात्रेचा प्रभाव पडल्‍याचे दिसला नाही. या राज्‍यातील दोन लोकसभा मतदारसंघात भारत जोडो यात्रा काढण्‍यात आली होती. तसेच दिल्‍लीतील आम आदमी पार्टीला यंदाही एकही जागा जिंकता आलेली नाही. हिमाचल प्रदेशमध्‍यही काँग्रेसची पाटी कोरीच राहिली आहे. मध्य प्रदेशात भारत जोडो यात्रेत समाविष्ट असलेल्या सात लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला एकाही जागेवर विजय मिळवता आलेला नाही. तेलंगणा राज्‍यातील सात लाेकसभा मतदारसंघातून भारत जोडो यात्रेचा झाला हाेते. येथेही काँग्रेसच्‍या पदरी निराशा आली. गुजरातमध्ये भारत जोडो न्याय यात्रेत पाच मतदारसंघांचा समावेश केला परंतु त्याचा परिणाम झाला नाही. भारत जाेडाे पदयात्रा काढण्‍यात आलेल्‍या  छत्तीसगडमधील चार लोकसभा मतदारसंघांत  काँग्रेसकडे पाठ फिरवली आहे. येथे 2019 मध्ये काँग्रेसने एक जागा जिंकली हाेती.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news