Hotel Check In Aadhaar Rules : हॉटेल मुक्कामासाठी आधार कार्डची गरज संपणार; 'या' सोप्या पद्धतीने होणार १ मिनिटात चेक-इन!

फोटोकॉपी जमा करण्‍याची कटकट संपणार, ग्राहकांची आधार माहितीही राहणार सुरक्षित
Hotel Check in Aadhaar Card Rules
Hotel Check in Aadhaar Card Rules AI-generated image
Published on
Updated on

Hotel Check in Aadhaar Card Rules : पर्यटक असो की कामानिमित्तचा प्रवास हॉटेममधील मुक्‍कात हा अनिवार्यच ठरतो. आता हॉटेल मुक्‍काम म्‍हटलं की, सर्वात आधी ओळखपत्र मागितले जाते. अनेक हॉटेल्समध्ये ग्राहकांकडून आधार कार्डची (Aadhaar Card) फोटोकॉपी जमा करून घेतली जाते. अनेकदा प्रवाशांकडे आधारची प्रत उपलब्ध नसते, यामुळे फोटोकॉपी करून आणावी लागते. आता हा त्रास कमी करण्यासाठी हॉटेल चेक-इन प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत.डिजिटल ओळख पडताळणीचा वापर वाढल्यामुळे आता हॉटेलमधील चेक-इन प्रक्रिया अधिक सुलभ आणि जलद होणार आहे. त्यामुळे ग्राहकांना आधार कार्डच्या physical प्रती (झेरॉक्स) सोबत बाळगण्याची किंवा जमा करण्याची गरज उरणार नाही.

असे होणार हॉटेलमधील चेक-इन

नवीन नियमांनुसार, ओळखीच्या पडताळणीसाठी QR कोड, OTP आणि ॲप आधारित डिजिटल व्हॅलिडे्शन यांसारख्या पद्धतींचा वापर केला जाऊ शकतो. म्हणजेच, येत्या काळात हॉटेलमध्ये खोली घेण्यासाठी दरवेळी आधार कार्डची फिजिकल फोटोकॉपी जमा करण्याची गरज भासणार नाही. याचा मुख्य उद्देश केवळ चेक-इन प्रक्रिया सुलभ करणे हा नसून ग्राहकांच्या आधार माहितीची सुरक्षा अधिक मजबूत करणे हा देखील आहे.

Hotel Check in Aadhaar Card Rules
Cheteshwar Pujara : चेतेश्वर पुजाराकडून ऑल-टाइम टॉप-५ भारतीय कसोटी वेगवान गोलंदाजांची निवड; मोहम्मद शमीला डच्चू!

QR कोड स्कॅन करून होणार पडताळणी

नव्या डिजिटल पडताळणी पद्धतीमुळे, प्रत्यक्ष कागदपत्रे देण्याऐवजी ग्राहक आता इलेक्ट्रॉनिक पद्धतीने आपली ओळख पडताळून पाहू शकतील. ग्राहकाची ओळख तपासण्यासाठी QR-कोड आधारित पडताळणीचा वापर केला जाऊ शकतो.

OTP द्वारे देखील होणार ओळखीची तपासणी

QR कोड व्यतिरिक्त OTP आधारित पडताळणीचा पर्यायही या नवीन व्यवस्थेत उपलब्ध असेल. ग्राहकाच्या नोंदणीकृत (Registered) मोबाईल नंबरवर OTP पाठवून ओळखीची पुष्टी करण्याची पद्धत अवलंबली जाऊ शकते. ही पद्धत ऑनलाइन बँकिंग किंवा डिजिटल पेमेंटमध्ये वापरल्या जाणाऱ्या पडताळणी प्रक्रियेसारखीच सुरक्षित असेल.

Hotel Check in Aadhaar Card Rules
Bill Gates AI warning : 'AI'बाबत बिल गेट्स यांचं मोठं विधान; "माणसांसाठी ४०% नोकऱ्या राखीव ठेवा, अन्यथा..."

आधार माहिती राहणार अधिक सुरक्षित

आधार कार्डची फोटोकॉपी जमा करताना वैयक्तिक माहितीच्या सुरक्षेची मोठी चिंता असते. कागदावरील आधारच्या प्रतीमध्ये नाव, पत्ता आणि इतर संवेदनशील माहिती छापलेली असते. ही प्रत दीर्घकाळ एखाद्या संस्थेकडे राहिल्यास डेटा प्रायव्हसीचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. डिजिटल पडताळणीमुळे असा कागदी डेटा साठवून ठेवण्याची गरज उरणार नाही.याचा अर्थ भारतातील सर्व हॉटेल्सनी लगेचच आधार किंवा इतर ओळखपत्रे मागणे बंद केले आहे असा होत नाही. हॉटेल्सचे नियम आणि तिथली नियमावली यांनुसार हे निकष बदलू शकतात. हा बदल प्रामुख्याने डिजिटल ओळख पडताळणीचा वापर वाढवण्याच्या दिशेने आहे.

Hotel Check in Aadhaar Card Rules
Centenarian longevity secret : शंभरीपार आयुष्य जगण्याचे रहस्य काय? जपानी संशोधकांना मिळाला पेशींमधील महत्त्वाचा पुरावा

प्रवाशांना होणार मोठा फायदा

नियमात बदलामुळे आता हॉटेल चेक-इनची प्रक्रिया अधिक जलद आणि सोपी होईल. ओळख पडताळणीसाठी कमी वेळ लागेल. आधार कार्डची फिजिकल प्रत सोबत बाळगण्याची किंवा फोटोकॉपी करण्याची गरज उरणार नाही. कागदाचा वापर मोठ्या प्रमाणावर कमी होईल. वैयक्तिक माहितीची गोपनीयता आणि सुरक्षा अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे. रिपोर्टनुसार, UIDAI ओळख पडताळणी प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी आणि डिजिटल पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी काम करत आहे.अनेक हॉटेल्सनी ही नवीन प्रणाली आधीच स्वीकारली आहे. दरम्यान, डिसेंबरपर्यंत देशातील ५० टक्क्यांहून अधिक हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समध्ये ओळख पटवण्यासाठी डिजिटल प्रणाली लागू केली जाऊ शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news