IMD Weather Forecast | आज, उद्या 'जोरधार'...'या' राज्यांना अतिवृष्टीचा इशारा

दक्षिण कोकणाला आज, उद्या 'रेड अलर्ट'
Yellow alert for Mumbai, Palghar and orange alert for Thane, Raigad today
आज, उद्या 'जोरधार'..., तर 'या' राज्यांना अतिमुसळधारेचा इशाराFile Photo

पुढारी ऑनलाईन डेस्क: राज्यांतील अनेक जिल्ह्यात पावासाचा जोर वाढला आहे. दरम्यान दक्षिण कोकणता मुसळधार सुरूच आहे. दरम्यान दक्षिण कोकणतील अनेक नद्यांनी धोका पातळी ओलांडली असून पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली. पुढील आणखी दोन दिवस दक्षिण कोकणात रेड अलर्ट देण्यात आला असून अतिवृष्टीचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.

भारतीय हवामान विभागाने आज प्रसिद्ध केलेल्या बुलेटीननुसार, राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्राचा घाट परिसर आणि गोव्यात आज (दि.१५ जुलै) आणि उद्या (१६ जुलै) अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर कर्नाटक किनारपट्टीचा भाग, संपूर्ण दक्षिण कर्नाटक, केरळ आणि माहे या राज्यात (दि.१५ जुलै) देखील रेड अलर्ट असून अतिमुसळधा ते अतिवृष्टीची शक्यता वर्तवली आहे.

पुढील ४ ते ५ दिवस संपूर्ण कोकण, गोवा, केरळ, माहे कर्नाटक किनारपट्टी आणि संपूर्ण दक्षिण कर्नाटक, मध्य महाराष्ट्राचा काही भाग आणि गुजरातच्या संपूर्ण भागात पुढील ४ ते ५ दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे, असेही हवामान विभागाने म्हटले आहे.

आज १५ जुलै रोजी राज्यातील विदर्भ आणि मराठवाडा, तेलंगणा, आंध्रप्रदेश आणि यमेनची किनारपट्टी संपूर्ण उत्तर कर्नाटक भारतीय हवामान विभागाकडून वर्तवली आहे, असे देखील भारतीय हवामान विभागाने बुलेटीनमध्ये स्पष्ट केले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news