HDFC credit card new rules: या क्रेडिट कार्डधारकांसाठी विमानतळावर लाऊंज अ‍ॅक्सेस बंद होणार, वाचा नवे नियम

HDFC credit card new rules | 10 जून 2025 पासून लागू होणार; Tata Neu कार्डधारकांना मोठा झटका: थेट लाऊंज प्रवेश बंद, आता व्हाऊचरवर अवलंबून
HDFC credit card new rules
HDFC credit card new rules Pudhari
Published on
Updated on

HDFC credit card changes 2025 lounge access update wallet loading fees reward point limits tata neu Infinia card updates

नवी दिल्ली : एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्ड नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत. विशेषतः जे ग्राहक विमानतळ लाऊंज अ‍ॅक्सेससाठी क्रेडिट कार्ड वापरतात त्यांच्यासाठी हे बदल महत्वाचे ठरणार आहेत.

10 जून 2025 पासून, Tata Neu Infinity आणि Tata Neu Plus क्रेडिट कार्डधारकांना कार्ड स्वाईप करून थेट लाऊंजमध्ये प्रवेश मिळणार नाही. त्याऐवजी, प्रत्येक तिमाहीतील खर्चाच्या आधारे वॉऊचर दिले जातील, जे लाऊंज अ‍ॅक्सेससाठी वापरता येतील.

HDFC credit card new rules
RBI Gold Loan Rules India 2025 | सोन्यावर कर्ज घेणं आता सोपं नाही; RBI ने आणले कडक नियम

1 जुलै 2025 पासून लागू होणारे अतिरिक्त शुल्क

भाडे भरतानाचे शुल्क

प्रत्येक भाडे व्यवहारावर 1 टक्का शुल्क आकारले जाईल. महिन्याला जास्तीत जास्त 4999 शुल्क आकारले जाईल.

ऑनलाइन गेमिंगसाठी शुल्क

जर महिन्याला 10000 रुपयांपेक्षा अधिक खर्च केला, तर त्यावरही 1 टक्के शुल्क आकारले जाईल. प्रत्येक व्यवहारावर कमाल 4999 रुपये शुल्क आकारले जाईल.

वॉलेट लोडिंगवरील शुल्क

PayZapp वगळता इतर सर्व वॉलेटसाठी, जर एका महिन्यात 10000 रुपयांपेक्षा जास्त लोड केलं, तर 1 टक्के शुल्क लागेल. प्रति व्यवहार कमाल 4999 रुपये शुल्क असेल.

HDFC credit card new rules
India fourth largest economy: जपानला मागे टाकत भारताची अर्थव्यवस्था जगात चौथ्या स्थानी; 4 ट्रिलियन डॉलरचा टप्पा गाठला

PayZapp काय आहे?

PayZapp ही एचडीएफसी बँकेचे डिजिटल पेमेंट अ‍ॅप आहे. याच्या माध्यमातून बिल पेमेंट, शॉपिंग, फंड ट्रान्सफर हे सगळं बँक खाते किंवा डेबिट/क्रेडिट कार्डशिवाय करता येतं.

इन्शुरन्सवर रिवॉर्ड पॉईंट मर्यादा

1 जुलै 2025 पासून:

  • Infinia व Infinia Metal Edition कार्डवर महिन्याला कमाल 10000 रिवॉर्ड पॉइंट्स

  • Diners Black, H.O.G Diners Club, BizBlack Metal वर कमाल 5000 पॉइंट्स

  • इतर सर्व कार्ड्सवर फक्त 2000 पॉइंट्स मर्यादा.

31 जून 2025 पर्यंतचे नियम:

  • दैनंदिन व्यवहारांवर (इन्शुरन्ससाठी) कमाल 5000 किंवा 2000 रिवॉर्ड पॉइंट्सची मर्यादा.

  • Marriott Bonvoy HDFC कार्डवर कोणतीही मर्यादा नाही. या कार्डद्वारे इन्शुरन्स प्रीमियम भरल्यास, रिवॉर्ड पॉईंट्सवर कोणतीही मर्यादा नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news