'ऑपरेशन सिंदूर'ची पाकिस्तानला देत होता माहिती; ISI गुप्तहेराला अटक

Operation Sindoor ISI Agents Arrested | एका विद्यार्थ्याने "ऑपरेशन सिंदूर"संदर्भातील गोपनीय माहिती पाकिस्तानला लीक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
Operation Sindoor ISI Agents Arrested
Operation Sindoor ISI Agents Arrested file photo
Published on
Updated on

Operation Sindoor ISI Agents Arrested |

चंदीगड : भारत-पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर हरियाणातील कैथलमध्ये एका पाकिस्तानी गुप्तहेरला पकडण्यात आले. पाकिस्तानच्या लष्कराला आणि आयएसआय (ISI) या गुप्तचर संस्थेला 'ऑपरेशन सिंदूर' बाबत माहिती पुरवल्याचे त्याने कबुल केले आहे. कैथल जिल्ह्यातील मस्तगढ चिका गावातील देवेंद्र सिंह (२५) असे त्याचे नाव असून तो डिप्लोमाचा विद्यार्थी आहे.

पाकिस्तानला दिली 'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती  

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमध्ये राबवलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' या अत्यंत गोपनीय लष्करी मोहिमेची माहिती पाकिस्तानला पुरवल्याचे त्याने कबुल केले आहे. याबाबत कैथलचे डीएसपी वीरभान यांनी सांगितले की, "गुप्त माहितीच्या आधारे आम्ही विशेष पथक तयार करून त्याला ताब्यात घेतले. प्राथमिक तपासात त्याने ऑपरेशन सिंदूरविषयीची माहिती पाकिस्तानला दिल्याचे उघड झाले आहे."

जप्त केलेल्या डिजिटल उपकरणांची पोलिसांकडून तपासणी

देवेंद्रकडून जप्त केलेल्या मोबाईल, लॅपटॉप आणि इतर डिजिटल उपकरणांची सायबर पोलिसांचे पथक चौकशी करत आहे. मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

२०२४ मध्ये पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या एजंटांसोबत ओळख

देवेंद्र सिंह हा पंजाबमधील एका महाविद्यालयात एमए (राजकारणशास्त्र) चा विद्यार्थी होता. नोव्हेंबर २०२४ मध्ये तो नानकाना साहिब गुरुद्वारला गेला होता, त्यावेळी त्याची पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या एजंटांसोबत ओळख झाली. तेव्हापासून तो त्यांच्या संपर्कात होता. हरियाणा आणि पंजाबमधून पाकिस्तानला माहिती पुरवण्याचे प्रकार वाढत असताना ही घटना उघडकीस आली आहे. यापूर्वी, २४ वर्षीय नौमन इलाही याला हरियाणातील पानिपत येथे पाकिस्तानला संवेदनशील माहिती पाठवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. अमृतसरमधील लष्करी आस्थापनांची माहिती पाकिस्तानला पाठवल्याच्या आरोपाखाली पंजाब पोलिसांनी पलक शेर मसीह आणि सूरज मसीह यांनाही अटक केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news