शंभू सीमेवर शेतकऱ्यांचा पुन्हा एल्गार; पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Farmers Protest | शेतकऱ्यांचा बॅरिकेट्स तोडण्याचा प्रयत्न
शंभू सीमेवर शेतकऱ्यांचा पुन्हा एल्गार; पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : हरियाणाच्या अंबालाजवळील (Haryana Ambala) शंभू सीमेवर (Shambhu border) सुमारे ९ महिन्यांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी (Farmers Protest) आज शुक्रवारी (दि.६) दिल्लीकडे कूच करण्याचा प्रयत्न केला. यावेळी शेतकऱ्यांनी बॅरिकेट्स तोडले. यादरम्यान शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी हरियाणा पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. या दरम्यान एक शेतकरी जखमी झाला. त्याला रुग्णवाहिकेतून जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. तर एका शेतकऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी हरियाणा पोलिसांनी रस्त्यात लोखंडी खिळे लावले आहेत. यावेळी शेतकऱ्यांनी पोलिसांच्या कारवाईचा निषेध करत घोषणा दिल्या.

हरियाणाकडून शेतकऱ्यांना सांगण्यात आले आहे की, तुमचे शिष्टमंडळ पाठवा, आम्ही चर्चा करू. तोपर्यंत शेतकऱ्यांना पुढे जाऊ दिले जाणार नाही. पण शेतकरी दिल्लीच्या दिशेने कूच करण्यावर ठाम आहेत.

सर्व पिकांना किमान आधारभूत किंमतीची (MSP) कायदेशीर हमी द्यावी, यासह अन्य मागण्यांसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. यापूर्वीही शेतकऱ्यांनी १३ फेब्रुवारी आणि २१ फेब्रुवारी रोजी दिल्लीच्या दिशेने कूच करण्याचा प्रयत्न केला होता. पण, त्यांना पंजाब-हरियाणा सीमेवरील शंभू आणि खनौरी येथे सुरक्षा दलांनी रोखले होते. शेतकरी गेल्या ९ महिन्यांपासून संयुक्त किसान मोर्चा (गैर-राजकीय) आणि किसान मजदूर मोर्चाच्या बॅनरखाली शंभू आणि खनौरी सीमेवर तळ ठोकून आहेत.

शेतकरी नेते सुरजित सिंग फूल, सतनाम सिंग पन्नू, सविंदर सिंग चौटाला, बलजिंदर सिंग चडियाला आणि मनजीत सिंग यांच्या नेतृत्वाखाली १०१ शेतकऱ्यांच्या गटाने दुपारी १ वाजता दिल्लीच्या दिशेने मोर्चाला सुरुवात केली. शेतकरी नेते सर्वनसिंग पंधेर हे आंदोलनस्थळी उपस्थित आहेत. दिल्लीच्या दिशेने कूच करणाऱ्या १०१ शेतकऱ्यांमध्ये त्यांचा सहभाग नव्हता.

शेतकऱ्यांनी बॅरिकेट्स एक थर तोडला

राष्ट्रध्वज आणि त्यांच्या शेतकरी संघटनांचे झेंडे फडकावत शेतकऱ्यांनी बॅरिकेट्स एक थर तोडला. पण काँक्रीट ब्लॉक्स, लोखंडी खिळे आणि तारांचा अडथळा आणि कडक बंदोबस्तामुळे त्यांना पुढे जाण्यापासून रोखण्यात आले.

अंबालामधील इंटरनेट सेवा ९ डिसेंबरपर्यंत बंद

शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अंबालामध्ये ९ डिसेंबरपर्यंत इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. रस्त्यावर बॅरिकेडिंग करण्यात आले असून अंबाला प्रशासनाने पाच अथवा त्याहून अधिक लोकांना एकत्र जमण्यास बंदी घातली आहे.

शंभू सीमेवर शेतकऱ्यांचा पुन्हा एल्गार; पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या
उत्तर प्रदेशातील पीलीभीत, चित्रकूटमध्ये भीषण अपघातात १० ठार; ५ जण जखमी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news