हरियाणात नवा ट्विस्ट! काँग्रेसला मागे टाकत भाजपची आघाडी

Haryana Election Results 2024 | बहुमताचा आकडा पार
Haryana Election Results 2024
हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या ९० जागांसाठी आज मंगळवारी मतमोजणी सुरु आहे.(file photo)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या (Haryana Election Results 2024) ९० जागांसाठी आज मंगळवारी मतमोजणी सुरु आहे. सुरुवातीला काँग्रेसने ५१ जागांवर आघाडी घेतली होती. तर भाजप २७ जागांवर आघाडीवर होते. सुरुवातीच्या मतमोजणीत निर्णायक आघाडी घेतल्यानंतर काँग्रेसने विजयाचे सेलिब्रेशनही सुरु केले होते. पण सुरुवातीच्या दीड तासांच्या मतमोजणीनंतर हरियाणात नवा ट्विस्ट पाहायला मिळाला. सकाळी १० च्या सुमारास भाजपने काँग्रेसला मागे टाकत ४९ जागांवर आघाडी घेतली. तर काँग्रेस ३७ जागांवर आघाडीवर आहे.

९० जागा असलेल्या विधानसभेत बहुमतांचा आकडा ४६ आहे. सध्याच्या कलानुसार, येथे भाजपने आघाडी घेतली आहे. दरम्यान, ओम प्रकाश चौटाला यांचा इंडियन नॅशनल लोक दल (INLD) ३ जागेवर पुढे आहे.

Vinesh Phogat : विनेश फोगट पिछाडीवर

जुलाना मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढविणाऱ्या कुस्तीपटू विनेश फोगट पिछाडीवर आहेत. निवडणूक आयोगाच्या सुरुवातीच्या ट्रेंडनुसार, विनेश यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे योगेश बैरागी सुमारे १ हजार मतांनी आघाडीवर आहेत. तर सिरसा येथून गोपाल कांडा पिछाडीवर आहेत. भूपेंद्र सिंह हुड्डा ११ हजार मतांनी आघाडीवर आहे. अंबाला कँटमधून अनिव वीज पिछाडीवर आहेत.

काँग्रेसला विजयाची खात्री- भूपिंदर सिंह हुड्डा

हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंह हुड्डा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, भाजपने सुरुवातीच्या मतमोजणीत आघाडी घेतली असली राज्यातील विधानसभा निवडणुकीत आमचा पक्ष जिंकेल, असा मला विश्वास आहे. राज्यात काँग्रेस बहुमताने सरकार स्थापन करणार असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. तसेच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा पक्षश्रेष्ठी ठरवतील, असेही ते म्हणाले.

Haryana Election Results 2024
Live Updates | हरियाणात भाजपची ४८ जागांवर आघाडी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news