Haryana Election 2024 | हरियाणात तिसऱ्यांदा भाजपचे सरकार

मुख्यमंत्री नायब सिंह सैनी विजयी
Haryana Election Result
हरियाणा विधानसभा निवडणूक मतमोजणी. file photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : हरियाणात भाजपने (Haryana Election 2024) हॅट्ट्रिक केली आहे. ९० जागा असलेल्या हरियाणा विधानसभेत भाजपने बहुमताचा ४६ चा आकडा पार केला. तर काँग्रेसला ३६ जागांपर्यंत मजल मारता आली. सायंकाळी ५.३० वाजता निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार, भाजपने ३८ जागा जिंकल्या असून त्यांनी ११ जागांवर निर्णायक आघाडी घेतली. तर काँग्रेसने ३१ जागा जिंकल्या असून ५ जागांवर त्यांनी आघाडी घेतली. हा ट्रेंड शेवटपर्यंत कायम राहिल्यास भाजपला ४९ आणि काँग्रेसला ३६ जागा असे चित्र होईल. अपक्षांनी ३ जागा मिळवल्या आहेत. दरम्यान, नायब सिंह सैनी हरियाणाचे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

मुख्यमंत्री नायब सिंह सैनी विजयी

हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी लाडवा विधानसभा मतदारसंघातून १६,०५४ मतांनी विजयी झाले आहेत.

संघर्षाचा आणि सत्याचा विजय : विनेश फोगट

जुलाना येथून विजयी झाल्यानंतर काँग्रेसच्या उमेदवार विनेश फोगट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "संघर्षाचा मार्ग निवडलेल्या प्रत्येक मुलीचा आणि महिलेचा हा लढा आहे. हा संघर्षाचा आणि सत्याचा विजय आहे. देशाने दिलेले प्रेम आणि विश्वास कायम जपेन," असे विनेश यांनी म्हटले आहे.

विनेश फोगाट यांनी मैदान मारलं!

हरियाणा विधानसभा निवडणुकीत (Haryana assembly election) जुलाना मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार कुस्तीपटू विनेश फोगट (Vinesh Phogat) विजयी झाल्या. भाजपचे योगेश बैरागी यांचा ६ हजार १५ मतांनी पराभव केला. विनेश यांना ६५०८० मते मिळाली तर योगेश कुमार यांना ५९०६५ मते मिळाली.

निकालावर काँग्रेसचा सवाल? 

सुरुवातीच्या आघाडीनंतर मतमोजणीत काँग्रेस पिछाडीवर गेली. निवडणूक आयोगाचा डेटा अपडेट केला जात नाही. प्रशासनावर दबाव आणण्यासाठी ही आकडेवारी उशिरा जाहीर केली जात आहे. मात्र कोणालाही निराश होण्याची गरज नाही, असे काँग्रेस नेत्यांचे मत आहे.

भाजपची हरियाणातील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी

2024 चे निकाल भाजपची हरियाणातील सर्वोत्तम कामगिरी आहे. 1980 मध्ये स्थापनेनंतर केवळ दोन वर्षांनी भाजपने हरियाणात निवडणूक लढवली होती. 1982 च्या निवडणुकीत भाजपने सहा जागा जिंकल्या होत्या. भाजपने 1987 मध्ये 16, 1996 मध्ये 11, 2000 मध्ये 6 आणि 2005 मध्ये दोन जागा जिंकल्या. 2009 मध्येही पक्षाला दुहेरी आकडा गाठता आला नाही आणि केवळ चार जागा जिंकता आल्या. हरियाणा निवडणुकीत भाजपची सर्वोत्तम कामगिरी 2014 च्या निवडणुकीत झाली होती, जेव्हा भाजपने 33.3 टक्के मतांसह 47 जागा जिंकल्या होत्या. 2019 मध्ये भाजपच्या मतांची टक्केवारी वाढली. परंतु जागा कमी झाल्या आणि पक्षाला 36.7 टक्के मतांसह केवळ 40 जागा जिंकता आल्या. आतापर्यंतच्या मतमोजणीनुसार भाजप 50 जागांवर आघाडीवर आहे. राज्याच्या निवडणूक इतिहासातील ही पक्षाची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी असेल.

भाजप आघाडीवर असून बहुमताचा आकडा पार केला आहे.

विनेश फोगट सहा फेऱ्यांनंतरही पिछाडीवर

हरियाणाच्या जुलाना मतदारसंघातील उमेदवार विनेश फोगट सहा फेऱ्यांनंतरही पिछाडीवर आहे. या जागेवर भाजपचे योगेश कुमार आघाडीवर आहेत. या ट्रेंडमध्ये विनेश जिंदमधील मतमोजणी केंद्रात पोहोचली.

हरियाणा, जम्मू आणि काश्मीर निवडणुकीतील सध्याच्या ट्रेंडबद्दल, काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या डॉ. शमा मोहम्मद म्हणतात, "काँग्रेस बहुमताने जिंकेल. काश्मीरमध्ये भाजपचा पराभव होत आहे हे आधीच माहित होते.

जास्त मते आणि कमी जागांचे गणित काय?

हरियाणा विधानसभेसाठी मंगळवारी सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी सुरू आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, सकाळी 10.53 वाजता काँग्रेसला 40.50 टक्के म्हणजेच 12 लाख 90 हजार 490 मते मिळाली होती. तर भाजपला 38.70 टक्के म्हणजेच 12 लाख 33 हजार 256 मते मिळाली होती. काँग्रेसला एकूण मते जास्त मिळाली असली तरी भाजपला जास्त जागा मिळाल्या आहेत.

माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा मतमोजणीच्या ४ थ्या फेरीनंतरही २२ हजार १८२ मतांच्या फरकाने आपली आघाडी कायम ठेवली आहे.

...तर मी मुख्यमंत्री होईन : अनिल विज

अंबाला कँट विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार अनिल विज म्हणाले, "भाजप निवडणुकीत आघाडीवर आहे आणि ते (काँग्रेस) आनंद साजरा करत आहेत. काँग्रेस पक्षातील अनेकांना भूपिंदरसिंग हुड्डा यांनी निवडणूक हरावी अशी इच्छा आहे. जनतेचा जनादेश आणि हायकमांडचा निर्णय असेल तर मी मुख्यमंत्री होईन.

कोणत्या जागांवर कोण पुढे?

जुलाना मतदारसंघातून विनेश फोगट पिछाडीवर

सिरसा येथून गोपाल कांडा पिछाडीवर

भूपेंद्र सिंह हुड्डा ११ हजार मतांनी आघाडीवर

अंबाला कँटमधून अनिव विज पिछाडीवर

काँग्रेस ३९ जागांवर तर भाजप ४७ जागांवर आघाडीवर

तब्बल दोन तासानंतर भाजपने आघाडी घेतल्याचे दिसत आहे. हरियाणात काँग्रेस ४४ जागांवर तर भाजप ४२ जागांवर आघाडीवर

हरियाणामध्ये बहुमताने सरकार स्थापन करणार : पवन खेरा

हरियाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीवर, काँग्रेस नेते पवन खेरा म्हणतात, "आम्हाला आज दिवसभर लाडू आणि जिलेबी खायला मिळतील, असा विश्वास आहे, आम्ही पंतप्रधान मोदींनाही जिलेबी पाठवणार आहोत. आम्हाला विश्वास आहे, आम्ही जम्मू-काश्मीर आणि हरियाणामध्ये बहुमताने सरकार स्थापन करणार आहोत.

माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डांसह विनेश फोगट आघाडीवर

सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भूपेंद्र सिंह हुड्डा गढ़ी सांपला किलोई मतदारसंघातून आघाडीवर आहेत तर भाजपच्या उमेदवार मंजू हुड्डा पिछाडीवर आहेत. जुलाना मतदारसंघातून माजी कुस्तीपटू विनेश फोगाट आघाडीवर आहे.

हरियाणात ४८ जागांवर काँग्रेस तर भाजप १६ जागांवर आघाडीवर 

दिल्लीत काँग्रेस कार्यकर्त्यांकडून लाडूचे वाटप

हरियाणा आणि जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना काँग्रेस कार्यकर्ते दिल्लीतील AICC मुख्यालयात लाडूचे वाटप करत आहेत.

मतमोजणी सुरू

हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. हरियाणातील सर्व 22 जिल्ह्यांतील 90 विधानसभा जागांवर आणि जम्मू-काश्मीरमधील सर्व 20 जिल्ह्यांतील 90 जागांवर उमेदवारांच्या भवितव्याचा आज निर्णय होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news