Haridwar Mob Attack: दुसऱ्या धर्मातल्या मैत्रिणीला भेटायला गेलेल्या तरुणाला अमानुष मारहाण; गळ्यात बांधला कुत्र्याचा पट्टा

Haridwar Latest News: पीडित महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी केला १० हून अधिक जणांवर गुन्हा दाखल
Pudhari
Haridwar Crime NewsAI GENERATED IMAGE
Published on
Updated on

Haridwar Mob Attack :

हरिद्वारमध्ये आंतरधर्मीय मैत्रीवरून अत्यंत धक्कादायक आणि अमानुष प्रकार समोर आला आहे. परधर्मीय मैत्रिणीला तिच्या घरी भेटायला गेलेल्या मुस्लिम तरुणाला १० ते १२ जणांच्या जमावाने घरात घुसून बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. क्रूरतेची सीमा ओलांडत या जमावाने तरुणाच्या गळ्यात कुत्र्याचा पट्टा बांधून त्याला अमानुष मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी १० हून अधिक जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.

तरुणाला अमानुष मारहाण

पीडित तरुणीने तक्रारीत म्हटलं आहे की, “मी त्यांना त्याला मारहाण करण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी ऐकले नाही. त्यांनी आम्हांला शिवीगाळ केली, त्याला बेदम मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी देऊन निघून गेले,” असे तिने सांगितले. मूळची लखनौची असलेली ही तक्रारदार महिला जवळपास एक दशकापासून हरिद्वारमध्ये राहत आहे.

Pudhari
Crime News: इंजिनिअर तरुणीचे धक्कादायक कृत्य; निर्वस्त्र मंदिरात गेली अन् देवीची मूर्ती घेऊन तलावात उडी मारली, कारण काय?

घटनेचा व्हिडिओ व्हायरल

घटनेच्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, आरोपी पीडित व्यक्तीची चौकशी करत असताना, त्याला एका घरासमोर बसवून त्याच्या गळ्यात कुत्र्याचा पट्टा बांधण्यात आला होता. 'द इंडियन एक्सप्रेस'ला महिलेच्या बहिणीने सांगितले की, हरियाणातील कर्नालचा तरुण हरिद्वारमध्ये काम करतो. तो त्यांना भेटायला येत असे. शनिवारी (दि. १८ जुलै) काही लोकांनी दरवाजा ठोठावला. माझ्या बहिणीने तो उघडला. ते आत घुसले आणि त्याला मारहाण करू लागले. त्याला रक्तस्राव होऊ लागल्यावरही ते थांबले नाहीत. त्यांनी माझ्या बहिणीला शिवीगाळ केली. त्याला घरातून बाहेर काढून त्याच्या गळ्यात कुत्र्याचा पट्टा बांधला.

Pudhari
Mob attack: रस्त्यावर अश्लील कृत्य करणार्‍या तरुणाचा जमावाच्या हल्ल्यात मृत्यू

त्याचा जीव गेला असता, तर जबाबदार कोण?

तक्रारदार महिलेने सांगितले की, त्याचा जीव गेला असता, तर जबाबदार कोण असते? त्याला बेदम मारहाण करण्यात आली. जमावाने त्याचा फोन आणि इतर सामान हिसकावून घेतल्याचा दावाही तिने केला. दरम्‍यान या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कायद्याच्या कलमांनुसार स्वेच्छेने दुखापत करणे, दंगल, घरात घुसणे, गुन्हेगारी धमकी आणि शांतता भंग करण्याच्या उद्देशाने हेतुपुरस्सर अपमान करणे या आरोपांखाली गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे.

Pudhari
नांदेडच्या देळूबमध्ये एका - घरावर जमावाचा हल्ला

अद्याप कोणालाही अटक नाही

या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, असे पोलिसांनी सांगितले. शहर सर्कल ऑफिसर, शिशुपाल सिंग नेगी यांनी सांगितले की, गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. “पुढील कारवाई करण्यासाठी आरोपींना ओळखण्याकरिता आम्ही फुटेज गोळा करत आहोत,” असे ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news