Gwalior accident: ग्वाल्हेरमधील शीतला माता मंदिराजवळ भाविकांच्या अंगावरून ट्रक गेला; १२ ठार, ४० जण जखमी

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे आज (दि. १८) पहाटे एक भीषण अपघात झाला आहे. शीतला माता मंदिराकडे जाणाऱ्या भाविकांच्या अंगावर एक अनियंत्रित भरधाव ट्रक जाऊन धडकल्याने १२ जणांचा मृत्यू झाला
Gwalior accident
Gwalior accidentFile Photo
Published on: 
Updated on: 

Accident Sheetla Mata Temple Gwalior

ग्वाल्हेर: मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे आज (दि. १८) पहाटे एक भीषण अपघात झाला आहे. शीतला माता मंदिराकडे जाणाऱ्या भाविकांच्या अंगावर एक अनियंत्रित भरधाव ट्रक जाऊन धडकल्याने १२ जणांचा मृत्यू झाला, तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. धान्याने भरलेला हा ट्रक पोलिसांचे बॅरिकेट्स तोडून थेट मंदिराच्या बाहेरच्या भिंतीवर आणि गेटवर आदळला, ज्यामुळे हा मोठा अनर्थ घडला.

नेमकं काय घडलं?

ग्वाल्हेरचे एसएसपी धर्मवीर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना पहाटेच्या सुमारास छिनोर बाजूकडून खाली उतरणाऱ्या रस्त्यावर घडली. या मार्गावर अवजड वाहनांच्या प्रवेशास बंदी आहे. अपघातानंतर एकूण ३९ जणांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यापैकी १२ जणांचा मृत्यू झाला. ५ ते ६ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. या दुर्घटनेत कर्तव्यावर असलेले दोन पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत.

प्रत्यक्षदर्शींनी सांगितला थरारक अनुभव

घटनास्थळावरील एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले, "पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडला. मी काही लोकांना जागीच तडफडताना पाहिले. ट्रक प्रचंड ओव्हरलोड होता, तो अचानक आला आणि त्याने दुकाने व भाविकांना अक्षरशः फरफडत नेले. माझा भाऊही यात जखमी झाला असून सध्या घटनास्थळी मोठी तारांबळ उडाली आहे."

ग्वाल्हेरच्या जिल्हाधिकारी रुचिका चौहान यांनी सांगितले की, छिनोरकडून मंदिराच्या दिशेने येणाऱ्या ट्रकने नियंत्रण गमावले आणि तो एका बाजूला सलग फरफटत गेला. माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने रुग्णवाहिका व मदत पथके घटनास्थळी रवाना केली.

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या रस्त्यावर पोलिसांची चौकी आणि स्टॉपर लावण्यात आले होते, असे असतानाही हा ट्रक या प्रतिबंधित मार्गावर कसा शिरला, याचा सखोल तपास सुरू आहे. तसेच, ट्रक डाव्या बाजूला का झुकला व त्याचे स्टेअरिंग कसे फेल झाले, याबाबत आरटीओ पथकाकडून वाहनाची तपासणी केली जात आहे. या दुःखद घटनेनंतर स्थानिक परिसरात संताप आणि हळहळ व्यक्त होत असून, अवजड वाहनांच्या नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांमधून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news