टॉयलेट सीटमधून येत होता शिट्टीचा आवाज, फोडल्यावर समोर आला कोब्रा - VIDEO

टॉयलेट सीटमधून फुसफुसण्याचा विचित्र आवाज येत असल्याने कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
toilet seat cobra hiding
टॉयलेट सीटमधून येत होता शिट्टीचा आवाज, फोडल्यावर समोर आला कोब्रा - VIDEOfile photo
Published on
Updated on

gurugram viral video whistling sound coming from toilet seat cobra hiding

पुढारी ऑनलाईन : गुरुग्राममधील गढौली कलां गावात एका घरातील टॉयलेट सीटमधून फुसफुसण्याचा विचित्र आवाज येत असल्याने कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. कुटुंबीयांनी वाइल्डलाइफ कन्झर्वेटरला बोलावले. त्यानंतर प्लंबरच्या मदतीने टॉयलेट पॉट फोडण्यात आला. तेव्हा आतमध्ये तब्बल ६ फूट लांबीचा विषारी कोब्रा लपून बसल्याचे समोर आले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

toilet seat cobra hiding
Bollywood News : “माझ्याशिवाय काश्मीरला जाऊ नकोस!” वडिलांचा शब्द शाहरुखने वर्षानुवर्षे पाळला, पण पुढे..

टॉयलेट सीटमधून येत होता शिट्टीसारखा आवाज

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, ही घटना गुरुग्राममधील गढौली कलां गावातील आहे. एका कुटुंबाच्या टॉयलेट सीटमधून सतत शिट्टीसारखा आवाज येत होता. त्यामुळे घरातील सदस्य घाबरले आणि त्यांनी वाइल्डलाइफ कन्झर्वेटर अनिल गांडास यांना घटनास्थळी बोलावले.

अनिल गांडास यांनीही टॉयलेट सीटवर हाताने थाप मारली. त्यावेळी त्यांनाही सीटमधून शिट्टीसारखा आवाज ऐकू आला. दोन-तीन वेळा सीटवर थाप मारल्यानंतर टॉयलेटच्या आत साप असल्याचा त्यांना संशय आला.

टॉयलेट सीट फोडली अन् समोर आला कोब्रा

यानंतर टॉयलेट सीट फोडण्याचा निर्णय घेण्यात आला. सीट फोडताच त्याखालील अरुंद जागेत विषारी कोब्रा लपून बसल्याचे दिसले. बराच प्रयत्न केल्यानंतर या सापाला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.

अनिल गांडास यांनी सांगितले की, हा कोब्रा सुमारे ६ फूट लांबीचा आणि अत्यंत विषारी होता. त्यांनी नागरिकांना रात्री जमिनीवर झोपणे टाळण्याचा आणि मच्छरदाणीचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. पावसाळ्यात तसेच घराच्या आसपास उंदीर असल्यास साप घरात येण्याची शक्यता वाढते, असेही त्यांनी सांगितले.

घरातील टॉयलेटमध्ये साप शिरल्याची मिळाली होती माहिती

अनिल गांडास यांनी सांगितले की, शनिवारी रात्री त्यांना एका घरातील टॉयलेटमध्ये साप शिरल्याची माहिती मिळाली होती. ते घटनास्थळी पोहोचले तेव्हा कोब्रा कुठेही दिसत नव्हता. त्यामुळे साप घरातून बाहेर गेला असावा, असे त्यांना वाटले.

toilet seat cobra hiding
Rule Change Today : आजपासून देशात लागू झाले 'हे' ५ मोठे बदल... गॅस, दूधापासून कारपर्यंत महागाईचा चौफेर तडाखा..

मात्र, कुटुंबीयांच्या सांगण्यावरून त्यांनी टॉयलेट सीटवर थाप मारली असता आतून फुसफुसण्याचा आणि शिट्टीसारखा आवाज आला. त्यामुळे साप टॉयलेट सीटच्या आतच लपला असल्याचा त्यांना संशय आला.

रेस्क्यू करून कोब्राला जंगलात सोडले

यानंतर टॉयलेट सीट फोडण्यात आली आणि आत लपलेला कोब्रा समोर आला. रेस्क्यू टीमने त्याला सुरक्षितपणे बाहेर काढले आणि नंतर जंगलात सोडून दिले.

कोब्रा टॉयलेट सीटच्या आत कसा शिरला, हे आश्चर्यकारक असल्याचे अनिल गांडास यांनी सांगितले. तो सीटमधील एखाद्या छोट्या भेगेतून आत शिरला असावा. सापाचे शरीर लवचिक असल्याने तो अगदी अरुंद जागेतही लपून बसू शकतो. या थरारक सर्परेस्क्यूचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news